13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकीनं गेला होता बॉर्डर पार

| Updated on: Jan 23, 2021 | 8:52 PM

पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर अखेर हा मेंढपाळ भारतात परतला आहे.

13 वर्षानंतर पाकिस्तानवरुन परतला गुजरातचा मेंढपाळ, 2008 मध्ये चुकीनं गेला होता बॉर्डर पार
Follow us on

नवी दिल्ली : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एक मेंढपाळ 2008 मध्ये चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेला होता. त्याच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर अखेर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील नाना दिनारा गावातील 60 वर्षीय इस्माईल समा यांनी आपल्या मेंढ्या चारत असताना चुकून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांनी अटक करण्यात येऊ कारागृहात टाकण्यात आलं होतं.(Gujarat shepherd who went to Pakistan by mistake was released after 13 years)

भारतीय उच्चायुक्तानं दाखल केलेल्या एका याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर दोन दिवस आधीच इस्माईल समा यांची मुक्तता करण्यात आली होती. अटारी बॉर्डरवरील अधिकाऱ्यांनी सांगितलं की शुक्रवारी वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन इस्माईल समा हे अमृतसरला पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना घेण्यासाठी वाघा-अटारी बॉर्डरवर दाखल झाले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसरमध्ये काही औपचारिकता पूर्ण केल्या जातील. ज्यात समा यांच्या आरोग्य तपासणीचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जाणार आहे. दरम्यान त्यांच्य गावात एक एनजीओ चालवणारे फजल समा आणि त्यांचे नातेवाईक युनूस समा यांनी शनिवारी अमृतसरमध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये इस्माईल यांची भेट घेतली.

इस्माईल समा यांची कहाणी

‘मी आपल्या मेंढ्यांना चारताना चुकून पाकिस्तानच्या दिशेनं गेलो होतो. त्यांनी मला एक गुप्तहेर आणि RAW एजंट म्हणून अटक केली. आयएसआयने मला 6 महिने कारागृहात ठेवलं. त्यानंतर मला पाकिस्तानच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं. 5 वर्षे शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी मी 3 वर्षे त्यांच्या ताब्यात होतो. ऑक्टोबर 2016 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही माझी सुटका करण्यात आली नाही. मी 2018 पर्यंत हैदराबाद सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यानंतर मला दोन अन्य भारतीय कैद्यांसोबत कराचीच्या कारागृहात पाठवण्यात आलं’, अशी माहिती इम्साईल समा यांनी दिली आहे.

समा यांची सुटका कशी शक्य झाली?

पत्रकार जतिन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, समा यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर पीस अॅन्ड डेमोक्रसी आणि अन्य एका स्थानिक एनजीओने दोन्ही सरकारकडे संपर्क सुरु केला. त्याचबरोबर पाकिस्तान उच्चायुक्तांना एक पत्र लिहिलं आणि समा यांच्या सुटकेची मागणी केली. समा यांची सुटका ही भारतीय उच्चायुक्तांनी चार भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर होऊ शकली, असं देसाई यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Pakistan ने कोरोना लस मागितली तर भारत देणार का? परराष्ट्र मंत्रालयाने केलं स्पष्ट

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपाताचा कट, आरोपीकडून षडयंत्राची कबुली

Gujarat shepherd who went to Pakistan by mistake was released after 13 years