जीम ट्रेनरनं जाळ्यात ओढलं, लेडिज टॉयलेट झालं शोषणाचा अड्डा, महिला पुढे येताच उडाली खळबळ!

आरोपी माझ्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने घुसला. घरात घुसून त्याने माझ्यावर अत्याचार केला. तो मला धमकी द्यायचा. ब्लॅकमेल करायचा. त्याने माझा मोबाईल हॅक करून माझे आक्षेपार्ह फोटो घेतलो होते, असा आरोप तक्रारदार महिलेना केला होता.

जीम ट्रेनरनं जाळ्यात ओढलं, लेडिज टॉयलेट झालं शोषणाचा अड्डा, महिला पुढे येताच उडाली खळबळ!
gym trainer
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 4:27 PM

Gym Trainer : आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्याच्याशी इमान राखणं हे आपलं कर्तव्य असतं. परंतु काही लोक आपल्या कमाचा, कौशल्याचा फायदा घेऊन बेकायदेशीर प्रकार करतात. काही ठिकाणी तर पुरुष महिलांना त्रासदेखील देतात. सध्या अशाच एका जीम ट्रेनरला न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलंय. महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कसून तपास केल्याने या प्रकरणातील दोषीला 20 वर्षांची शिक्षा झाली आहे.

हे प्रकरण 2017 साली घडले होते. जीम ट्रेनरने एका महिलेचे शारीरिक शोषण केले होते. विशेष म्हणजे जीमच्या शौचालयात अगोदर तिच्यावर अत्याचार करून तो जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर अत्याचार करायचा.

Loading...

हे प्रकरण 2017 सालापासून न्यायालयात सुनावणीसाठी होते. न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल दिला असून आरोपी मोहम्मद मौजम अली (39) याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हैदरबादमधील साईबराबाद येथील रायदुर्गम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376, 448, 506 और 354(D)(I) अंतर्गत दोषी ठरवलं. दोषी व्यक्ती मोहम्मद मौजम अली गाचीबोवली येथील रामकी टावर्समध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचा. तो जानेवारी 2015 पासून जीमच्या शौचालयात महिलांचे लैंगिक शोषण करायचा.

आरोपी माझ्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने घुसला. घरात घुसून त्याने माझ्यावर अत्याचार केला. तो मला धमकी द्यायचा. ब्लॅकमेल करायचा. त्याने माझा मोबाईल हॅक करून माझे आक्षेपार्ह फोटो घेतलो होते, असा आरोप तक्रारदार महिलेना केला होता.

या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने हा प्रकार 11 फेब्रुवारी 2017 रोजी आपल्या पतीला सांगितला होता. त्यानंतर दोन दिवसांनी 13 फेब्रुवारी रोजी पतीने आपल्या पत्नीला सोबत घेऊन रायदुर्गम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून पुरावे गोळा केले होते. 15 फेब्रुवारी 2017 कोडी या आरोपीला अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी कसून तपास केल्याने संबंधित महिलेला न्याय मिळाला आहे. या प्रकरणी आरोपीला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us