AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Upendra Limaye : नाहीतर तुला एक्सपोज करेन…दिग्दर्शकानं उपेंद्र लिमये यांना थेट दिलेली धमकी, अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

Upendra Limaye : दिग्दर्शकाने 'जोगवा' या सिनेमादरम्यान उपेंद्र लिमये यांना धमकी दिलेली. याबद्दलचा किस्सा अभिनेत्यानं एका मुलाखतीत सांगितला आहे.

Upendra Limaye : नाहीतर तुला एक्सपोज करेन...दिग्दर्शकानं उपेंद्र लिमये यांना थेट दिलेली धमकी, अभिनेत्यानं सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 28, 2026 | 4:18 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पेज ३’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘जोगवा’ चित्रपटातील तायप्पाच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र, ही महत्त्वपूर्ण भूमिका त्यांना सहजासहजी मिळाली नव्हती. दिग्दर्शक राजीव पाटील यांनी त्यांना थेट आव्हान दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले.

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोगवा’ चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवला. अंधश्रद्धा आणि समाजातील एका गंभीर प्रथेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी तायप्पाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भूमिकेच्या तयारीपासून ते राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यापर्यंतचा प्रवास सांगितला.

उपेंद्र लिमये यांनी सांगितला किस्सा

उपेंद्र लिमये म्हणाले, ‘मला आजही आठवतंय, राजीवने ‘आय ड्रीम’मध्ये चित्रपट साइन केला आणि तो माझ्या घरी आला. तो मला म्हणाला, ‘जोगवा साइन केली. तुला वाटतं ना तू खूप सॉलिड ॲक्टर आहेस? मलाही वाटतं तू खूप सॉलिड ॲक्टर आहेस. आता मी तुला तायप्पा देतो. करून दाखव. नाहीतर मी तुला एक्सपोज करतो. एक अभिनेता म्हणून तुझ्या किती मर्यादा आहेत, ते दाखवून देतो.’

तायप्पाची भूमिका साकारण्यासाठी उपेंद्र लिमये यांनी जवळपास दोन महिने सराव केला होता. या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल सुचवण्याची मुभाही त्यांना देण्यात आली होती. चित्रपटातील भावनिक प्रसंग आणि क्लोजअप शॉट्ससाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याच शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग त्यांच्या कायम लक्षात राहिला. उपेंद्र लिमये यांनी सांगितलं की, चित्रपटातील एका क्लोजअप शॉटनंतर राजीव पाटील यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते, ‘उप्या, यावर्षी तुला नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार मिळणार. इतका भारी शॉट दुसरा कोणी देऊच शकणार नाही. तू सिनेमात जे काम केलंय, ते कुणीच करू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार तुलाच मिळाला पाहिजे, नाहीतर माझा पुरस्कारावरचा विश्वास उडेल.’

Follow Us
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...