AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon DCC Bank Election: फॉर्म बाद करण्यासाठी अधिकाऱ्याला फोन, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या; शिंदेंच्या नेत्याचा मोठा निर्णय

किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज आधी अवैध करण्यासाठी तसेच नंतर वैध करण्यासाठी मीच अधिकाऱ्यांना फोन केला होता, असे मोठे विधान आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर सभेतून केले होते. या वक्तव्याला अनुसरून कायदेशीर रित्या विधी तज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सहकार आयुकांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे. 

Jalgaon DCC Bank Election: फॉर्म बाद करण्यासाठी अधिकाऱ्याला फोन, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या; शिंदेंच्या नेत्याचा मोठा निर्णय
Jalgaon DCC Bank ELection
| Updated on: Nov 28, 2026 | 4:12 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी:  जळगावच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची  शिवसेना शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार करणार आहेत. निवडणुकीतील उमेदवाराचा अर्ज बाद आणि वैध करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फोन केल्याचा दावा केल्यानंतर मंगेश चव्हाण यांच्याविरोधात आता किशोर पाटील यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार किशोर पाटील तक्रार करणार…!

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, त्यांचे सुपुत्र सुमित पाटील विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला आहे. अशातच आता किशोर पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज आधी अवैध करण्यासाठी तसेच नंतर वैध करण्यासाठी मीच अधिकाऱ्यांना फोन केला होता, असे मोठे विधान आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर सभेतून केले होते. या वक्तव्याला अनुसरून कायदेशीर रित्या विधी तज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन सहकार आयुकांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे.

दुसरीकडे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडत असून याप्रकरणात जी चौकशी होईल तिला सामोरे जायला तयार असल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली आहे.  याप्रकरणात वरिष्ठांनी कुठलेही माहिती मागवली ती सुद्धा पुरवू तसेच द्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व..! 

दरम्यान, भाजप आमदार मंगेश चव्हाण तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील निर्णयाधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यावर आमदार किशोर पाटील ठाम आहेत. त्यामुळे जळगावमध्ये नवा राजकीय अध्याय सुरु होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या 21 पैकी 12 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित 9 जागांवर 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Follow Us
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...