Video : सॉफ्टवेअर इंजिनीअरिंची नोकरी सोडा, मेहंदी काढून दिवसाला कमावते 1 लाख! महिलेची कमाई पाहून, नेटकरी चकित!
परदेशात नोकरी करायची म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर आयटी क्षेत्र,मोठ्या कंपन्या आणि लाखोंचे पॅकेज येतं. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनं आपल्या वेगळ्याचं कौशल्यातून अतिरिक्त कमाईचा मार्ग शोधला ही महिला मेंहदी आर्टिस्ट असून ती दिवसाला जवळपास 1 लाखांची कमाई करते.

परदेशात नोकरी करायची म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर आयटी क्षेत्र,मोठ्या कंपन्या आणि लाखोंचे पॅकेज येतं. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनं आपल्या वेगळ्याचं कौशल्यातून अतिरिक्त कमाईचा मार्ग शोधला आहे. ही महिला पेशाने सॉफ्टेवेअर इंजिनीअर असून, नोकरीसोबतच मेहंदी आर्टिंस्ट म्हणूनही काम करते. विशेष म्हणजे मेहंदी काढण्यासाठी ती जवळपास तासाला 100 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 9 ते 10 हजार रूपये आकारते. तिच्या कमाईचा हा आकडा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर असूनही मेहंदी कलेची आवड जपली
अमेरिकेत राहणाऱ्या प्रियंका जैन असं या महिलेचं नाव आहे. ती पूर्णपणे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करते. तिच्या मुख्य उत्पान्नाचा सोस्त्र नोकरी असला तरी मेहंदी काढण्याची आवड तिने व्यवसायाच्या स्वरूपात जपली आहे. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली.
प्रियंका सांगते की, अमेरिकेत मेहंदी काढण्याठी ती साधारण 100 डॉलर प्रति तास आकारते. भारतीय रूपयांमध्ये ही रक्कम जवळपास 9 ते 10, 000 रूपये होते. एवढंच नाही तर काही ग्राहकांकडून तिला त्या पैश्याव्यतिरिक्त 20 टक्क्यांपर्यंत टिपही मिळते.
View this post on Instagram
लग्नात मेहंदी काढण्यासाठी मिळतात 1 लाख रूपये
लग्नासाठी मेहंदी काढण्याची ऑर्डर मिळाल्याल कमाई आणखी वाढते, एखाद्या वधूची मेहंदी काढण्यासाठी सलग 10 तास काम केल्यास प्रियंकाला एका दिवसात जवळपास 1 लाख रूपये मिळू शकतात, म्हणजेच तिची मेहंदीची कला तिला नोकरीव्यक्तिरिक्त चांगल उत्पन्न मिळवून देतें.
छोट्या पासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक कामाला सन्मान
प्रियंकाच्या मते, अमेरिकेत कलाकारांच्या कामाला आणि कलेला आदर दिला जातो. भारतात अनेकदा मेहंदी आर्टिस्टच्या कामाकडे तितक्या प्रतिष्ठेने पाहिलं जात नाही, असं तिला जाणवलं. मात्र अमेरिकेत कलाकार म्हणून तिला मिळणारा सन्मान अधिक महत्त्वाचा वाटतो. कोणंतही काम लहान किंवा मोठं नसतं. प्रत्येक कामाला योग्य मान मिळायला हवा. अशी तिची भावना आहे.
प्रियंकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिलं जात आहे. त्याला जवळपास एक कोटी व्ह्यूज मिळाल्याचं वृत्त आहे. तिच्या कमाईसोबतच पारंपरिक कलेला परदेशात मिळणाऱ्या सन्मानाचीही चर्चा होत आहे. अनेकांनी कलाकारांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित केल आहे, तर काहींनी मेहंदीच्या कलेतून मिळणाऱ्या कमाईबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे
