
जम्मू-काश्मिरातील पहलगामवर मंगळवारी सकाळी झालेला हल्ला हा ४ अतिरेक्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. यातील दोन पाकिस्तानी होते आणि दोन स्थानिक कश्मीरी होते. त्यांना पाकव्याप्त कश्मिरच्या शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या शिबिरात हमासने लष्कर- ए -तोयबाच्या ( LeT ) आणि जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर एक विशेष प्रशिक्षण शिबिरात एक मॉड्युल तयार केले होते. येथे पाकिस्तानीची गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीने या अतिरेक्यांना खडतर प्रशिक्षण देण्यात आल्याचे आता उघडकीस आले आहे.
यंदा ५ फेब्रुवारी रोजी इस्रायलने सुटका केलेल्या हमासच्या नेते पाकिस्तानी सरकारच्या निमंत्रणावर पाकिस्तानात गेले होते. त्यांना पीओकेला नेण्यात आले होते. तेथे त्यांची LeT आणि JeM च्या अतिरेक्यांनी भेट झाल्याचे म्हटले जात आहेय.
रावलकोट येथे एका रॅलीचे आयोजन केले होते.तेथे हमासच्या या नेत्यांना घोड्यांवरुन फिरवण्यात आले. त्यांचे स्वागत क्रांतीकारक असल्याप्रमाणे केले गेले. या कार्यक्रमात हमासचे प्रवक्ते डॉ. खालिद कद्दूमी आणि डॉ. नाजी जझीर यांचे साथीदार वरिष्ठ नेता मुफ्ती आझम आणि बिलाल अलसल्लात देखील उपस्थित होते.
या रॅलीत पाकिस्तानातील अनेक मोठे अतिरेकी नेते सामील झाले होते. त्यात JeM प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, लॉन्चिंग कमांडर असगर खान कश्मीरी आणि LeT चे अनेक वरिष्ठ कमांडर देखील यात सामील होते. या रॅलीचा उद्देश्य एक संदेश देण्याचा होता. संदेश हा की काश्मीरी आणि पॅलेस्टीनी एकाच पॅन-इस्लामिक जिहादचा भाग आहेत. भारत आणि इस्रायल विरुध्द एकजुट होणे गरजेचे असल्याचे या मिटींगमध्ये ठरविण्यात आले होते असे उघडकीस आले आहे.
प. बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर गुप्तचर संस्था अधिक सतर्क झाल्या आहेत. या हिंसाचारात बांगलादेशातील काही हेरांचा समावेश होता असाही संशय केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना आहे.