AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Malhotra : पाकिस्तानच नव्हे, या सर्वात मोठ्या शत्रू देशाच्याही संपर्कात; ज्योतीच्या हेरगिरीने अधिकारी हैराण

हिसारची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी जासूसी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्या आलिशान जीवनशैली आणि कमी पगारातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. तपासात ती पाकिस्तान आणि चीनला अनेकदा गेली असल्याचे आणि व्हीआयपी सुविधा मिळवल्याचे समोर आले आहे.

Jyoti Malhotra : पाकिस्तानच नव्हे, या सर्वात मोठ्या शत्रू देशाच्याही संपर्कात; ज्योतीच्या हेरगिरीने अधिकारी हैराण
ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं उघड झालं आहेImage Credit source: social media
| Updated on: May 18, 2025 | 2:51 PM
Share

हरियाणाच्या हिसारची युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या बरीच चर्चेत आहे. ज्योतीचे कारनामे पाहून स्वत: पोलिसांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. अवघा 20 हजार रुपये पगार असताना महागड्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायची, महागड्या हॉटेलात जायची आणि अनेक देश फिरून यायची… हा सर्व प्रकार समोर आल्याने पोलीस हैराण झाले आहेत. भारताचा नंबर एकचा शत्रू असलेल्या पाकिस्तानसाठी ज्योती हेरगिरी करत असल्याचं उघड झालं आहे. चीनसाठीही तिने हेरगिरी केली का? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस आता तिची संपूर्ण कुंडली काढत आहे.

पाकिस्तानसाठी ज्योती म्होत्रा हेरगिरी करायची. त्यासाठी तिला केवळ पैसेच मिळत नव्हते. तर पाकिस्तान आणि चीनच्या दौऱ्यात व्हीआयपी ट्रिटमेंटही मिळायची. एवढेच नव्हे तर ती जेव्हाही पाकिस्तानात जायची तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांचं संरक्षण मिळायचं. तसेच पाकिस्तानातील कोणत्याही भागात, कोणत्याही शहरात आणि कोणत्याही गल्लीत मुक्त फिरण्याची तिला मुभा होती. पाकिस्तानात एखादा भारतीय गेल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. तो कुठे जातो? काय करतो? किती दिवस राहतो यावर लक्ष ठेवलं जातं. ज्योतीसाठी मात्र अख्खं पाकिस्तान ओपन करून दिलेलं होतं. तिला पाकिस्तानातील हायप्रोफाईल पार्ट्यांमध्येही सहभागी करून घेतलं जात होतं.

चीनमध्ये रेड कार्पेट

तिचे वडील ऊर्जा खात्यातून निवृत्त झाले आहेत. पेन्शवर तिचं घर चालतं. पण ज्योती प्रचंड खर्च करायची. विशेष म्हणजे युट्यूबमधून मिळणारी कमाई सुद्धा ती खर्च करत नसायची. तिचा फिरण्याचा सर्व खर्च पाकिस्तानी अधिकारी करायचे. विमान असो वा ट्रेन… ती फर्स्ट क्लासने फिरायची. महागड्या हॉटेलात राहायची. हा सर्व खर्च पाकिस्तानी अधिकारी करायचे, असं तपासातून उघड झालं आहे. पोलिसांनी ज्योतीचा कसून तपास केला आहे. यावेळी तिने एक एक माहिती समोर दिली आहे. तिची माहिती ऐकून पोलिसांना धक्काच बसला. चीन दौऱ्यावर गेल्यावर व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याची माहिती तिने दिली आहे.

चिनी अधिकाऱ्याशी भेट

ज्योती पाकिस्तानातील व्हिआयपी पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायची. पाकिस्तानच्या उच्चायोगातील अधिकारी दानिश याच्यासोबत ती अनेक पार्ट्यांमध्ये सामील व्हायची. दानिश यानेच तिची एका पार्टीत चीनी अधिकाऱ्यांशी भेट घालून दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता ज्योतीने पाकिस्तानसाठीही हेरगिरी केली का? याचा शोधही घेतला जात आहे.

हेही वाचा – Pak ने ज्योती-देवेंद्रला कसं बनवलं हेर ? देशात आणखी किती गद्दार ?

या देशातही गेली

ज्योती फक्त पाकिस्तान किंवा चीनलाच गेली नव्हती तर पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत इंडोनेशिया, थायलंड, दुबई, भूतान, बांग्लादेश आणि नेपाळलाही जाऊन आली आहे. पोलिसांच्या चौकशीत तिने 22 ऑक्टोबर 2018 रोजी तिचा पासपोर्ट बनल्याचं सांगितलं. तिचा पासपोर्ट 21 ऑक्टोबर 2028 पर्यंत व्हॅलिड आहे.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच