Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?

| Updated on: Jan 03, 2021 | 9:56 AM

दिल्लीत हाडं फोडणाऱ्या थंडीसोबतच पावसानेही हजेरी लावली (Heavy Rain In Delhi). दिल्लीत आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.

Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत हाडं फोडणाऱ्या थंडीसोबतच पावसानेही हजेरी लावली (Heavy Rain In Delhi). दिल्लीत आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या अंदाजानुसार, पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात दिसायला लागला आहे. पालममध्ये 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर रिझ, आयानगर आणि लोधी रोड येथेही पावसाच्या सरी बरसल्या.”(Heavy Rain In Delhi)

त्याशिवाय, हवामान विभागाने येत्या 2-3 दिवसांपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे गारठा वाढू शकतो. दिल्ली-एनसीआरमध्ये 3, 4 आणि 5 जानेवारीला मुसळाधार पाऊस होईल, तसेच, गारपीटीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पंजाबमध्ये येत्या दोन दिवसात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

IMD नुसार, राजगड, अलवर, दौसा, सोनीपत, दादरी, नोएडा, गाजियाबाद, अलीगड, बदायूं, मोदीनगर, मथुरा, हाथरस, जिंद, पानीपत, करनाल सह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागानुसार, उत्तर भारतात थंडीसोबतच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हिमाचल प्रदेशच्या केलांगमध्ये तापमान शून्याच्या खाली 7.3 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं.

दिल्लीत शनिवारीही पाऊस

दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी देखील काही भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे कालपासून दिल्लीतील तापमानात आणखी घट झाली आहे (Heavy Rain In Delhi).

महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असली तरी सध्या महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. परिस्थिती ही आहे की दुपारच्या वेळी राज्यातील बऱ्याच शहरांमध्ये उकाडा जाणवत होता. सध्या तापमान स्थिर राहणार असून पुढील आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली आणि उत्तर भारतात सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील वातावरणात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heavy Rain In Delhi

संबंधित बातम्या :

Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

Mumbai Weather Alert | मुंबईत थंडीचा जोर वाढला, 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला