Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडावा वाढला आहे. कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागला आहे.

Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 9:03 AM

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे (Maharashtra Winter Weather Alert). कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागला आहे. आज मुंबईतील पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमानाइतकं घसरलं आहे. तर महाराष्ट्राचं मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा 6 अंशावर आला आहे (Maharashtra Winter Weather Alert).

मुंबईचा पारा माथेरानइतका

मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 16 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे. सलग दोन दिवसांपासून मुबंईत तापमान कमी असल्याने मुंबईकरांना माथेरानचा फिल येतो आहे.

महाबळेश्वरात पारा 6 अंशावर

महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 6 अंशावर येऊन पोहचला आहे. महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरा कमी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी हिमकण पाहायला मिळत आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. त्यातच आज काही ठिकाणी हिमकण पाहायला मिळाले. मागील दोन वर्षापूर्वीही आजच्या दिवशी हिमकण पाहायला मिळाले होते.

वाशिमचं तापमान

वाशिमचं कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस इतकं आहे. तर कमाल तापमान हे 11 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं.

परभणीत कडाक्याची थंडी

परभणी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. परभणीचा पारा 5.5 अंशावर पोहोचला आहे. शहरासह ग्रामीण भागात थंडीची लाट पसरली आहे. थंडी आणि धुक्यामुळे परभणीकरांची सकाळ 1 ते 2 तास उशिराने होत आहे (Maharashtra Winter Weather Alert).

निफाडचा किमान पारा घसरला

निफाडचा किमान पारा घसरला आहे. 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद करण्यात आली आहे.

शहापूरमध्ये थंडी वाढली

वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शहापूरमध्ये कडाक्याची थंडी पडली असून पारा घसरला आहे. येथील तापमान हे 15 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. कडाक्याची थंडी पडल्याने बच्चे कंपनी थंडीत कुडकुडली असून उब घेण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.

चंद्रपूरचं तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर

चंद्रपूरचं किमान तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

Maharashtra Winter Weather Alert

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.