America, Israel, Iran war : इराणने मैत्री जपली, भारतासाठी थेट मोठी घोषणा, आता टेन्शनच मिटलं

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. मात्र युद्ध सुरू असताना देखील इराण भारताच्या मदतीला धावून आलं आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे भारताचं मोठं टेन्शन दूर झालं आहे.

America, Israel, Iran war : इराणने मैत्री जपली, भारतासाठी थेट मोठी घोषणा, आता टेन्शनच मिटलं
motozba khamenei
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 7:41 PM

गेल्या 15 दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून होर्मुज स्ट्रेट बंद करण्यात आला आहे. होर्मुज स्ट्रेटमधून कोणत्याही जहाजानं जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यावर मिसाईल हल्ले करू असा थेट इशाराच इराणकडून देण्यात आला आहे. इराणने होर्मुज स्ट्रेट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही या मार्गावर सुरक्षा पुरवू अशी घोषणा अमेरिकेनं केली होती, मात्र या मार्गावरील जहाजांना सुरक्षा पुरवण्यास अमेरिकनं सैन्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे अनेक जहाजं गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अडकून पडली आहेत. जगभरात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे जगातील अनेक देश होर्मुज स्ट्रेट बंद असल्यामुळे इंधन तुटवड्याचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे भारतासाठी इराणमधून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणने भारतासाठी होर्मुज स्ट्रेटचा मार्ग खुला केला आहे.

इराणचे भारतामधील राजदूत मोहम्मद फतहली यांनी भारत आणि इराण संबंधांवर बोलताना मोठं विधान केलं आहे. दोन्ही देशांचे हितसंबंध एकसमान आहेत. इराण आणि भारताचं भविष्य देखील बऱ्याच अंशी परस्परांशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या हिताचा विचार केला पाहिजे. कोणताही तिसरा देश भारत आणि इराण संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही याकडे देखील दोन्ही देशांनी लक्ष दिलं पाहिजे, असं मोहम्मद फतहली यांनी म्हटलं आहे. भारत आणि इराणमध्ये जर एखाद्या कारणामुळे कधी दरार निर्माण झाली तर त्याचा फायदा इतर देश घेऊ शकतात. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, त्यामुळे जर काही मतभेद निर्माण झाले असतील तर ते आपल्या पातळीवरच सोडवले जावेत असंही यावेळी फतहली यांनी म्हटलं आहे.

भारताच्या जहाजाला इराणची परवानगी

दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केला आहे. या होर्मुज स्ट्रेटमधून एकही जहाज जाऊ देणार नाही, असा इशारा इराने दिला आहे. मात्र इराणकडून भारतीय जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वृत्ताला मोहम्मद फतहली यांनी देखील दुजोरा दिला आहे. इराणने भारतीय जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली आहे, मात्र किती जाहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली आहे, हे सांगणं योग्य होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us