मोर विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो? त्याचं हे गुपित तुम्हाला माहितीये का?

मोरांना तुम्ही अनेकदा साप खाताना पाहिलं असेल, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की मोर विषारी साप खावून देखील जिवंत कसा काय राहू शकतो? मोरांना सापांचा नैसर्गिक शत्रू म्हटलं जातं.

मोर विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो? त्याचं हे गुपित तुम्हाला माहितीये का?
peacock
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 9:53 PM

मोर हा मिश्रहारी पक्षी आहे. मोर धान्यांचे कण जसं की बाजारी, ज्वारी, गहू, तांदूळ यांच्या दाण्यांसोबतच सर्व प्रकारचे किडे, आणि विषारी साप देखील सहज खातो. मोर हा सापांचा नैसर्गिक शत्रू मानला जातो. त्यामुळे जिथे मोर असतात, तिथे शक्यतो साप आढळून येत नाहीत. असं म्हटलं जातं की मोर आधी सापांच्या डोळ्यांवर हल्ला करतो, आणि त्यानंतर त्यांना खातो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की मोर एवढे विषारी साप खातो, पण तरीही तो जिवंत कसा राहतो? यामागे नक्की काय कारण असावं? मोराच्या शरीरावर सापाच्या विषाचा परिणाम कसा होत नाही? अनेकांना याबाबत आश्चर्य वाटतं.

मोर हा सापांचा नैसर्गिक शत्रू मानला जातो. तो विषारी सापांना खाऊन टाकतो. एक प्रकारे मोर आपलं विषारी सापांपासून संरक्षणच करतो. परंतु मोरांना विषारी साप खाताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं की मोर विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो? तज्ज्ञांच्या मते मोराच्या शरीरामध्ये अशी क्षमता असते की त्याच्या शरीरावर सापाच्या विषाचा कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळेच मोर सहजपणे विषारी साप खाऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते सापांच्या विषात कॉम्प्लेक्स प्रोटीन असतं. जर हे प्रोटीन थेट रक्तात मिसळलं गेलं तर ते आपल्या गुणधर्माप्रमाणे शरीरावर परिणाम करतं, जर साप अतिविषारी असेल तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. मात्र जर सापाचं विष हे रक्तात मिसळलं नाही आणि एखाद्या पक्ष्याने साप थेट आपल्या तोंडाने गिळला किंवा खालला तर सापाचं विष हे त्याच्या रक्तात थेट मिसळत नाही, ते त्याच्या पोटात तसंच राहतं त्यामुळे त्या विषाचा त्या पक्ष्यावर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळेच मोराने कितीही विषारी साप खाल्ला तरी तो जिवंत राहू शकतो. कारण मोर हा साप थेट तोंडाने खातो किंवा गिळतो, त्यामुळे सापाचं विष त्याच्या रक्तात थेट मिसळत नाही.

मात्र तज्ज्ञ असं देखील सांगतात की या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, साप गिळताना शरीराला कुठेही थोडा जरी कट गेलेला असेल किंवा पोटात कुठे अल्सर असेल तर ते विष तुमच्या रक्तामध्ये थेट मिसळून शकतं आणि त्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतं. या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की ही माहिती पक्ष्यांसंदर्भात देण्यात आली आहे. माणसाने कधीही असा प्रयोग करू नये. यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो

Follow Us