बिअर की व्होडका, कोणते मद्य शरीरासाठी सुरक्षित; किती मद्य प्यावे? वाचा A टू Z

मद्यपानाच्या सवयीमुळे लिव्हरमध्ये चरबी साचून ‘फॅटी लिव्हर’ची समस्या निर्माण होऊ शकते. ही स्थिती दुर्लक्षित राहिली लिव्हरमध्ये सूज, जखमा असा त्रास होऊ शकतो.

बिअर की व्होडका, कोणते मद्य शरीरासाठी सुरक्षित; किती मद्य प्यावे? वाचा A टू Z
beer vodka and wine
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 9:33 PM

Alcohol Consumption : आजकाल मद्यपानाची सवय तरुण-तरुणींमध्ये चांगलीच वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये पिऊन बघणे हे लोकांच्या डोक्यातील वेगळेच फॅड आहे. परंतु मद्यपानाची सवय असेल तर यकृत खराब होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. दरम्यान, मद्यापान करताना काय काळजी घ्यावी? मद्यपानाचे प्रमाण काय असावे? या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

बीअर पिणे सुरक्षित आहे का? रेड वाईन आरोग्यासाठी चांगली असते का? किंवा महागडी व्हिस्की पिल्यास लिव्हरवर कमी परिणाम होतो का? हे प्रश्न सातत्याने विचारले जातात. सोशल मीडियावर आणि मित्रमंडळीतही यावर नेहमी चर्चा रंगते . मात्र तज्ज्ञांच्या मते, लिव्हरला कोणतेही मद्य पूर्णपणे सुरक्षित नाही.

मद्याचा प्रकार कोणताही असो, त्यामध्ये इथाइल अल्कोहोल (Ethanol) असते. हेच द्रव्य शरीरात गेल्यानंतर त्याचे विघटन करण्याची जबाबदारी लिव्हरवर येते. त्यामुळे बीअर, व्हिस्की, वोडका किंवा रेड वाईन यांपैकी कोणतेही पेय हे लिव्हरसाठी धोकादायक असते. मद्याचे प्रमाण जितके अधिक, तितका लिव्हरवरील ताणही वाढत जातो.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्पावधीत मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास लिव्हरवर अतिरिक्त भार पडतो. अल्कोहोलचे विघटन करताना शरीरात ‘अॅसिटाल्डिहाइड’ नावाचे विषारी रसायन तयार होते. हे रसायन जास्त प्रमाणात साचल्यास लिव्हरच्या पेशींना नुकसान पोहोचू लागते.

मद्यपानाच्या सवयीमुळे लिव्हरमध्ये चरबी साचून ‘फॅटी लिव्हर’ची समस्या निर्माण होऊ शकते. ही स्थिती दुर्लक्षित राहिली आणि दीर्घकाळ नियमित मद्यपान सुरू राहिले, तर पुढे लिव्हरमध्ये सूज, जखमा आणि अखेरीस ‘लिव्हर सोरायसीस’सारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. ही अवस्था जीवघेणी ठरू शकते.

मद्याची एक बॉटल जरी पिली तरी ते आरोग्यासाठी हानिकारकच असते. परंतु तुम्ही 350 मिलीलीटरपर्यंत बिअर आणि 150 मिलीलीटर पर्यंत वाईन प्राशन केल्यास तुमच्या यकृतावर कमी परिणाम होऊ शकतो.

(टीप- मद्य आरोग्यास हानिकारक असते. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us