Dhruv Rathee : ध्रुव राठी युट्यूबमधून एका दिवसाला किती रुपये कमावतो, त्याची संपत्ती किती? आकडा ऐकून थक्क व्हाल

सीजेपीच्या आंदोलनामुळे युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला या आंदोलनादरम्यान ताब्यात देखील घेण्यात आलं आहे. ध्रुव राठी याची एका दिवसाची कमाई किती असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Dhruv Rathee : ध्रुव राठी युट्यूबमधून एका दिवसाला किती रुपये कमावतो, त्याची संपत्ती किती? आकडा ऐकून थक्क व्हाल
Dhruv Rathee
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 5:08 PM

यूट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा CJP कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनामुळे चर्चेत आला आहे. तो या आंदोलनात सहभागी होण्यासाठी थेट जर्मनीमधून दिल्लीत दाखल झाला होता. त्यानंतर त्याला त्याच्या गुरुग्राम स्थित घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. ध्रुव राठी जर्मनीमध्ये राहतो. तो आपली पत्नी जुलीसोबत मिळून ट्रॅव्हल व्लॉग देखील बनवतो. ध्रुव राठी याचा जन्म हरियाणामध्ये झाला. त्याने मॅकॅनिकलमधून इंजीनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला. जर्मनीच्या कार्लज़ूए इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्याने आपली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर तो जर्मनीतच स्थायिक झाला. दरम्यान जर्मनीमध्ये शिकत असतानाच त्याला व्हिडीओ तयार करण्याची आवड निर्माण झाली. तो अवघड विषय सोपा करून लोकांना सांगू लागला. त्यानंतर त्याने आपले व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केले. लोकांनाही व्हिडीओ आवडल्यामुळे त्याच्या युट्यूब चॅनलला लाखो लोकांनी फॉलो केलं.

ध्रुव राठीचे दोन प्रमुख चॅनल आहेत, एका चॅनलवर तो विविध विषयांवर माहिती देणारे व्हिडीओ पोस्ट करत असतो, तर दुसऱ्या चॅनलवर ट्रॅव्हल्स संबंधित व्हिडीओ पोस्ट करतो. ध्रुव राठी याच्या कमाईचं मुख्य साधन हे डिजिटल कंटेंनचं आहे. तो यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतो. या शिवाय बँन्ड प्रमोशन आणि इतर काही डिजिटल प्रोजेक्टच्या माध्यमातून देखील त्याला पैसे मिळतात. ध्रुव राठीच्या एकूण संपत्तीबाबत वेगवेगळे दावे करण्यात येतात. परंतु त्याची एकूण संपत्ती ही जवळपास 58 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. मात्र तरी देखील त्याच्या संपत्तीच्या एकूण आकड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नााहीये. दरम्यान ध्रुव राठी या सर्व माध्यमातून दिवसाला कमीत कमी दोन लाखांच्या आसपास कमाई करतो, अशी देखील माहिती आहे.

Loading...

कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठं आंदोलन उभा केलं आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी सीजेपीची मागणी आहे. यासाठी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी हा भारतामध्ये आला आहे. त्याला या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us