
अमेरिकेची नासा-भारताची इस्रो यांचा सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) सॅटेलाईट बुधवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५.४० वाजता प्रक्षेपित करण्यात आला आहे. जीएसएलव्ही – एफ १६ रॉकेटने निसार उपग्रहाला घेऊन श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण घेतले होते. निसार उपग्रह सुर्य -समकालिक ध्रुवीय कक्षेत स्थापन करण्यात आला आहे.
निसार सॅटेलाईट नासा आणि इस्रोची संयुक्त मोहिम आहे. दोन्ही अंतराळ संस्थांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली आहे. अर्थात इस्रोने आधी देखील रिसोर्ससॅट आणि रिसेटसह पृथ्वीवर नजर राखणारे सॅटेलाईट लाँच केले आहेत, परंतू हे उपग्रह केवळ भारतीय क्षेत्राची टेहळणी करण्यापर्यंत मर्यादित होते.
निसार काय आहे ? अंतराळात जाऊन पृथ्वीची काय मदत करणार, हा कसे काम करणार आणि याचा शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय लाभ होणार ? निसार सॅटेलाईटसंबंधीत काही प्रश्नांची उत्तरे जाणूयात…
नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR ( निसार ) ) हा जगातला पहिला रडार सॅटेलाईट आहे. जो अंतराळातून पृथ्वीचे व्यवस्थित मॅपिंग करणार आहे. एवढेच नाही तर हा पहिला असा उपग्रह आहे जो डबल रडार बँडचा ( एल-बँड आणि एस-बँड ) वापर करतो. म्हणजे वेगवेगळ्या पर्यावरणीय आणि भूवैज्ञानिक परिस्थितींचे पाहणी करता येईल.
अंतराळात पोहचल्यानंतर हा उपग्रह निम्न पृथ्वी कक्षेत ( Low Earth Orbit – LEO ) फिरत राहणार आहे. निसार तीन वर्षे अंतराळात राहून पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे.
बँड याचा अर्थ रडार सिस्टीममध्ये रेडिओ व्हेव ची फ्रिक्वेन्सींना दर्शवणारे तंत्र. प्रत्येक बँड विविध प्रकारच्या तरंग (लहरी) फ्रिक्वेन्सी आणि व्हेवलेन्थवर (wavelength) काम करतात. त्याद्वारे निश्चित होते की किती दूरपर्यंत स्पष्ट पाहणे शक्य होऊ शकते. थोडक्यात दोन बँड म्हणजे दुहेरी रडार सिस्टीम्स होय.
L-बँड म्हणजे 1.25 GHz, 24 सेमी तरंगलहरी : जमीनीच्या आत जाण्यास सक्षम, जंगल आणि बर्फाखालचा डाटा देऊ शकतात. ग्लेशियरचे सरकणे, जमीन धसणे, ज्वालामुखी धगधगणे आणि भूकंपासंबंधी गतीविधींना ट्रॅक करण्याचे काम करण्यास सक्षम, हे रडार नासाने दिले आहे.
S-बँड म्हणजे 3.20 GHz, 9.3 सेमी तरंगलहरी: पृष्ठभागावरील प्रत्येक हालचाली टीपण्यास सक्षम असतात. पृष्ठभागातील आद्रता, शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर ( ब्रिज,डॅम आणि रेल्वे ट्रॅक ) च्या मुव्हमेंटला ट्रॅक करण्याच्या कामा येईल. हे रडार इस्रोने स्वत: तयार केला आहे.
निसार सॅटेलाईटची निर्मिती आणि एकत्रिकरण जानेवारी 2024 रोजी झाले होते. याचे लाँचिंग मार्च 2024 मध्ये होणार होते. परंतू हार्डवेअर अपग्रेड आणि अतिरिक्त परिक्षणामुळे याचे लाँचिंग जुलै 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते.
निसारमध्ये स्वीप सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) तंत्राचा वापर केला गेला आहे. या तंत्राद्वारे मोठ मोठ्या क्षेत्राचे हाय रिझॉल्युशनच्या (5-10 मीटर)सह स्कॅन करुन एकदम क्लिअर फोटो घेतले जाऊ शकतात. खास बाब म्हणजे SAR मुळे निसार ढगांमध्ये आणि अंधारात देखील डेटा गोळा करु शकतो. ज्यामुळे 24/7 तास पृथ्वीची टेहळणी किंवा निरीक्षण केले जाऊ शकते.
2.5 टन वजनाचा आहे निसार सॅटेलाईट
748 किमी पृथ्वीच्यावरुन एका ध्रुव ते दूसरे ध्रुवापर्यंत परिक्रमा करणार
12 दिवसाचा असणार निसार सॅटेलाईटचा स्कॅन चक्र
240 किमी क्षेत्राला एकाच वेळी कव्हर करणार
3 निसारचे नियोजित जीवनकाल तीन वर्षांचा आहे
80 टेराबाईट डेटा दर दिवशी उपलब्ध करणार
150 हून अधिक हार्ड ड्राईव्ह निसारच्या डेटाने भरली जाणार
निसार मिशन सतीश धवन अंतराळ केंद्रातून 102वे लाँचिंग आहे
निसार मिशनचा एकूण खर्च सुमारे 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे 13,120 कोटी रुपये आहे. यात इस्रोचा वाटा सुमारे 9.3 कोटी डॉलर (813 कोटी ) आणि नासाचा वाटा 1.118 अब्ज डॉलर (9,779 कोटी रुपये) इतका आहे. हा जगातील सर्वात महाग पृथ्वीचे निरीक्षण (Earth-observation satellite) करणारा उपग्रह आहे.
निसार प्रत्येक मोसमात 24 तास पृथ्वीचे फोटो खेचू शकतो. हा उपग्रह भूस्खलनाचा पत्ता लावू शकतो. आपात्कालिन व्यवस्थापनात मदत करु शकतो. आणि ग्लोबल वार्मिंगवर नजर ठेवू शकतो. या सॅटेलाईटने भारत, अमेरिका सह संपूर्ण जगाचा लाभ होणार आहे. हा पृथ्वीच्या नैसर्गिक साधन संपत्तीची निगराणी करण्यासाठी महत्वाचा उपग्रह आहे असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी म्हटले आहे.
हे अमेरिका आणि भारता दरम्यान पृथ्वीचे इतक्या विस्तृतपणे अवलोकन करणारे पहिले मिशन आहे असे नासा विज्ञान मिशन संचालनालयाचे एसोसिएट एडमिनिस्ट्रेटर निकोला फॉक्स यांनी म्हटले आहे.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की निसारच्या यशस्वी प्रेक्षपणामुळे येत्या दोन वर्षांत अन्य मानवरहित मोहिमा देखील लाँच केल्या जातील. या वर्षी डिसेंबरमध्ये व्योम मित्र नामक मानव रोबोटला अंतराळात पाठवले जाणार आहे. नंतर मार्च 2027 मध्ये गगनयान मिशन लाँच केले जाणार आहे. गगनयान मिशनमध्ये पृथ्वीच्या 400 किमी अंतर्गत कक्षेत तीन अंतराळ प्रवाशांना पाठवले जाणार आहे.
पृथ्वीत सतत बदल होत आहेत. ग्लेशियर वितळत आहेत. किनारे मागे सरकत आहेत आणि हे परिवर्तन इतक्या संथपणे होत आहे की सर्वसामान्यपणे कोणाचे लक्ष जात नाही. आता निसारचे मुख्य लक्ष्य हे पृथ्वीचा पृष्ठभाग, पर्यावरण आणि नैसर्गिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे हे आहे.
निसार उपग्रह दर 12 दिवसात पृथ्वीला स्कॅन करेल, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या परिवर्तनाचा हाय-फ्रिक्वेन्सी डाटा मिळू शकणार आहे. हा काही सेंटीमीटर इतक्या छोट्या बदलाला देखील रेकॉर्ड करणार आहे. हा भू-आकृती,बायोमास आणि पृष्ठभागाच्या उंचीला 5-10 मीटर रिझॉल्युशनसह मोजणार आहे.
निसारच्या डाटामुळे भूकंप, सुनामी, ज्वालामुखी स्फोट आणि भूस्खलन सारख्या धोक्यांचा अंदाज घेता येऊ शकतो आणि भूकंप आणि पुरासारख्या नैसर्गिक संकटांनी होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. हा सॅटेलाईट क्लायमेट चेंजच्या प्रभावांना समजण, शेती-शेतकरी यांच्यासाठी मातीचे विश्लेषण करणे आणि पायाभूत ढाच्याच्या निगराणी करण्याच्या कामी देखील मदतगार ठरु शकतो.
शेतकऱ्यांसाठी पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज लावणे आणि शेतीच्या नुकसानीचे आकलन करण्यात मदत करु शकेल, तेल गळतीच्या वेळी देखील हा उपग्रह मदत करणार आहे.
निसारची मुळे 1978 च्या एका सफल प्रक्षेपणाशी जुडलेली आहेत, जेव्हा नासाने सीसॅट उपग्रहाला कक्षेत स्थापित केले होते. हा जगातला पहिला एसएआर उपग्रह होता. हे मिशन केवळ 105 दिवस चालले.परंतू या उपग्रहाच्या आकड्यांनी पृथ्वीचे अवलोकनास नवे रुप दिले. आता सीसॅटच्या सुमारे 50 वर्षांनंतर निसारला पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्यात आले आहे.