जज साहेब माझ्या बायकोचे 9 लग्न, मी सातवा नवरा…थेट कोर्टात पोहोचलं पती-पत्नीचं भांडण, आलेल्या निकालाची एकच चर्चा!

संबंधित महिलेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी नऊ नव्हे तर फक्त 4 लग्न केले. अगोदर तलाक किंवा इस्लामिक पद्धीतने खुला झाल्यानंतरच मी दुसरे लग्न केलेले आहे, असा दावा केलाय.

जज साहेब माझ्या बायकोचे 9 लग्न, मी सातवा नवरा...थेट कोर्टात पोहोचलं पती-पत्नीचं भांडण, आलेल्या निकालाची एकच चर्चा!
husband and wife clash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 9:03 PM

Marriage and court decision : आपल्या समाजव्यवस्थेत लग्न ही खूपच महत्त्वाची व्यवस्था. एकदा लग्न झालं की पती-पत्नी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देतात. परंतु अलिकडे विवाहानंतर पती-पत्नीमध्ये भांडण आणि घटस्फोटांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घटस्फोटासाठी रोज शेकडो अर्ज दाखल होतात. एकदा घटस्फोटाचे प्रकरण कायदेशीर पातळीवर पोहोचले की पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. सध्या मात्र पती-पत्नीचे एक अजब भांडण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या भांडणात पतीने माझ्या पत्नीने एकूण 9 लग्न केले असून मी तिचा सातवा पती आहे, असा दावा केलाय. तर पत्नीने पती हिंसक आहे, तो हुंडा मागतो असा दावा करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय. आता न्यायालयानेही या प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिलाय. विशेष म्हणजे हे प्रकरण एका स्थानिक नेत्याचेच आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

हे प्रकरण कर्नाटक राज्यातील आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. होसापेटे येथील एका राजकारण्याने न्यायालयात दावा केला की, त्याच्या पत्नीने आतापर्यंत तब्बल नऊ लग्नं केली असून, तो तिचा सातवा पती आहे. मात्र, महिलेने हा दावा फेटाळत आपण केवळ चार लग्नं केल्याचे सांगितले.

Loading...

उडुपी न्यायालयात फौजदारी खटला

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर झाली. संबंधित महिलेने राजकारण्याविरोधात हुंड्याची मागणी आणि छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी उडुपी न्यायालयात फौजदारी खटला सुरू होता. या कारवाईला आव्हान देत राजकारण्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

नवऱ्याशी भांडणे, त्रास देणे आणि नंत…

राजकारण्याच्या दाव्यानुसार, त्याच्या पत्नीने 2004 सालापासून एक नव्हे तर 9 लग्न केले. माझ्या बायकोने पहिले लग्न केले तेव्हा तिचे वय 16 वर्षे होते. माझ्याशी लग्न झाले तेव्हा मी तिचा सातवा पती होतो. एकदा विवाह झाला की नवऱ्याशी भांडणे, त्रास देणे आणि नंतर पैशांच्या रुपात तडजोड करणे, असं माझी पत्नी करते, असा आरोप संबंधित राजकारण्याने केला. हा दावा करताना त्याने काही कागदपत्रेही न्यायालयात सादर केले.

संबंधित महिलेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी नऊ नव्हे तर फक्त 4 लग्न केले. अगोदर तलाक किंवा इस्लामिक पद्धीतने खुला झाल्यानंतरच मी दुसरे लग्न केलेले आहे. माझ्या नवऱ्याने सादर केलेले कागदपत्रे खोटे आहेत, असा दावा महिलेने न्यायालयापुढे केला.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

दरम्यान, या प्रकरणी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तसेच कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर ठोस पुरावे नसल्याचे सांगितले. फौजदारी खटला चालवण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्र दाखल झाले म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही,अशी भूमिका न्यायालयाने घेतली. तसेच राजकारण्याची याचिका स्वीकारून त्याच्यावर पत्नीच्या आरोपांनुसार कारवाई करण्याचीही मागणी फेटाळली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us