माझं सौभाग्य आहे की मी आरएसएसच्या वारशाचा एक भाग बनलो…काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तासांची लांबलचक मुलाखत (पॉडकास्ट ) दिली आहे. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी ही मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयावर आपले मन मोकळे केले आहे.

माझं सौभाग्य आहे की मी आरएसएसच्या वारशाचा एक भाग बनलो...काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
| Updated on: Mar 16, 2025 | 6:38 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना मुलाखत दिली आहे. तीन तास चाललेल्या मुलाखतीपूर्वी लेक्स फ्रिडमॅन यांनी ४५ तासांचा उपवास धरला होता. नरेंद्र मोदी यांनी आपण आरएसएसशी जोडलो गेलो हे माझे सौभाग्य आहे असे म्हटले आहे. मला माझ्या जीवनाचा उद्देश्य आणि निस्वार्थपणे सेवा करण्याची शिकवण आरएसएसकडून मिळाली असल्याचे पंतप्रधानानी अभिमानाने सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत आपल्या जीवनातील अनेक किस्से सांगितले आहेत. आरएसएसमुळे जीवनाला दिशा मिळाली आहे. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो की मला माझ्या जीवनाचा उद्देश्य आणि निस्वार्थ सेवेचे मुल्य आरएसएसमधून मिळाले असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यांनी यावेळी आरएसएसच्या जागतिक स्तरावर केलेल्या कार्याचे कौतूक केले. आरएसएस आज मोठ्या प्रमाणावर शिक्षण आणि आरोग्य सेवा देशभरात उपलब्ध करीत आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी डाव्या मजदूर संघ आणि आरएसएस जोडलेले मजदूर संघ यांच्यातील फरक देखील समजावून सांगितला. डाव्या विचारसरणीचा संघ म्हणतो की, ‘जगभरातील मजूरांनी कामगारांनी एक व्हा’ तर आरएसएसचा मजदूर संघ म्हणतो की, ‘मजूरांनो, जगाला एक करा’ हा फरक दाखवतो की आरएसएस आपल्या मुल्यांना कशाप्रकारे आपल्या दुष्टीकोनातून आत्मसात करते.’

जगाला अशा नेतृत्वाची गरज

लेक्स फ्रिडमॅन यांनी नरेद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत आतापर्यंतची सर्वात प्रेरणादायी मुलाखत असल्याचे म्हटले आहे. जगाला अशा नेतृत्वाची गरज आहे. जे केवळ आपल्या राष्ट्रापुरता विचार न करता जगाचा आणि मानव कल्याणाचा विचार करत आहेत असेही कौतूक फ्रिडमॅन यांनी केले आहे. भारताची एकता याच्या विविधेतच आहेत. विविध भाषा आणि परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेनंतरही भारताचा आत्मा एक आहे असे पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितले आहे.