बाबरीचा ढाचा पडताना पाहून मला रडू आलं, सोनिया गांधी यांचं विधान

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द गार्जियनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, 1992 साली  बाबरीचा ढाचा पाडताना पाहून मला रडू आलं होतं, तसेच आणीबाणीची घटना देखील चूक असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

बाबरीचा ढाचा पडताना पाहून मला रडू आलं, सोनिया गांधी यांचं विधान
Sonia Gandhi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 10:15 PM

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द गार्जियनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, 1992 साली  बाबरीचा ढाचा पाडताना मी ती घटना टीव्हीवर पाहिली, मी जेव्हा बाबरीचा ढाचा पडताना टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला अश्रू अनावर झाले होते. मी रडायला लागले होते. दरम्यान सोनिया गांधी यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला तेव्हा चांगल्या प्रकारे माहीत होतं की भारताला सेक्युलर बनवण्यासाठी त्यांना एक मोठी लढाई लढावी लागणार आहे. महात्मा गांधी, नेहरू आणि त्यांच्या सहाकऱ्यांनी जशा भारताचं स्वप्न पाहिलं होतं, तसा भारत बनवण्यासाठी आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. भाजप आणि कट्टर हिंदुत्ववादी पक्षाच्यां उदयामध्ये काही प्रमाणात आमच्या पक्षाला आलेल्या अपयशाचा देखील वाटा आहे, आम्ही काही गोष्टींमध्ये खूपच निष्काळीजपणा केला, असंही यावेळी सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आणीबाणीची घोषणा ही चूकच

Loading...

दरम्यान यावेळी बोलताना देशात आणीबाणी लावण्यात आली ही एक चूकच होती. जेव्हा आणीबाणीचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा आमचं कुटुंब दोन गटात विभागलं गेलं होतं. राजीव गांधी आणीबाणीच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी आपल्या आईला पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी असं देखील सांगितलं होतं. परंतु संजय गांधी मात्र आणीबाणीच्या बाजूने होते. एका फॅमेली डिनरच्या कार्यक्रमात संजय गांधींनी यावरून जोरदार वाद घातला होता. जर आणीबाणी लावण्यात नाही आली तर विरोधी पक्ष ऐकणार नाहीत, त्यांना आपल्याला थांबवायला हवं असं संजय गांधी यांनी म्हटलं होतं, असंही यावेळी सोनिया गांधी यांनी म्हटलं.

पुढे सोनिया गांधी यांनी असं देखील म्हटलं की, त्यावेळी संजय गांधी यांचा त्यांच्या आईवर जबरदस्त प्रभाव होता. यामुळे देखील लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे गांधी कुटुंबात देखील तणाव वाढला होता. राजीव गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करू नये, यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी यांचं ऐकलं नाही. जर संजय गांधी यांना त्यावेळी इंदिरा गांधी यांनी आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं असतं, तर त्यानंतर जे नुकसान झालं, ते नुकसान मोठ्या प्रमाणात टळलं असतं, असंही यावेळी सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us