AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुसलेला नायक, त्याला मनवण्यासाठी प्रेयसीची धडपड, या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडतील

धर्मेंद्र आणि मुमताज या आयकॉनिक जोडीवर चित्रित झालेल्या या सदाबहार गाण्याला लता मंगेशकरांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी शब्दांनी जिवंत केले आहे. या गाण्यामध्ये प्रेम आणि क्षणभराचा विरह अशा दोन्ही भावना जिवंत झालेल्या दिसून येतात.

रुसलेला नायक, त्याला मनवण्यासाठी प्रेयसीची धडपड, या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडतील
Lata Mangeshkar Bollywood Old SongsImage Credit source: social media
| Updated on: Nov 07, 2026 | 10:14 PM
Share

१९७३ मध्ये आलेल्या एका बॉलिवूड सिनेमाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या सिनेमामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्र आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांंनी अभिनय केलेला. या सिनेमाचं नावं होतं लोफर. हा सिनेमा त्यावर्षीच्या सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक होता. जो बॉक्स ऑफिसवरील कमाईमध्ये ७ व्या स्थानी राहिला होता. या सिनेमातील गाणीही प्रचंड गाजली. सिनेमाचं कथानकही दर्जेदार असल्याने सिनेरसिकांना या सिनमाने भूरळ घातली होती.

मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं

लता मंगेशकर यांच्या आवाजातील मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं हे गाणं प्रचंड गाजलं. आजही हे गाणं प्रत्येक संगीतप्रेमीच्या ओठांवर आपोआपच येतं. या गाण्याच्या व्हिडिओमध्येही धर्मेंद्र आणि मुमताज यांची खास केमिस्ट्री पाहायला मिळते. तर अभिनयही मनाला भूरळ पाडतो. गाण्याचे शब्द हे आनंद बक्षी यांनी लिहिलेले आहेत. तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं आहे. या गाण्यामध्ये नायक म्हणून धर्मेंद्र हा नायिकेवर म्हणजेच मुमताजवर नाराज असलेला पहायला मिळतो. त्याचवेळी नाराज नायकाला मनवण्यासाठी प्रेयसी काहीही करायला तयार आहे. तू मुझे आजमाने की कोशिश ना कर, मर ना जाऊं कहीं हे समर्पक शब्द म्हणजे गाण्याचा आत्मा आहेत. त्यामुळे हे गाणं थेट काळजाला भिडल्याशिवाय राहत नाही.

सिनेमाचं कथानक

धर्मेंद्र हा रणजित या भूमिकेत आहे. जो अनाथ असतो. शाळेमध्ये असताना त्याच्याकडून एका वर्गमित्राचा खून होतो. नंतर तो पळून जातो आणि गुन्हेगारी विश्वात सामिल होतो. नंतर मोठा झाल्यावर रणजित हा अंकल या त्याच्या बॉससा नाईट क्लब चालवत असतो. अंकलचा एक कट्टर शत्रू असतो जो अंकलचा काटा काढण्याच्या प्रयत्नात असतो. रणजितला अडकवण्यासाठी तो अंजू नावाच्या एका डान्सरला रणजितवर पाळत ठेवण्यासाठी पाठवतो. पण पुढे त्या दोघांमध्ये प्रेम आणि पश्चाताप असे प्रसंग या सिनेमामध्ये आणि खास करुन या गाण्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत.

गाण्याचे बोल

मैं तेरे इश्क़ में मर न जाऊँ कहीं

तू मुझे आज़माने की कोशिश न कर

ख़ूबसूरत है तू तो हूँ मैं भी हसीं

मुझसे नज़रें चुराने की कोशिश न कर

शौक़ से तू मेरा इम्तहान ले

तेरे कदमों पे रख दी है जान ले

बेकदर बेकबर मान जा ज़िद ना कर

तोड़ कर दिल मेरा ऐ मेरे हमनशीं

इस तरह मुस्कुराने की कोशिश ना कर

ख़ूबसूरत है तू तो हूँ मैं भी हसीं

मुझसे नज़रें चुराने की कोशिश न कर

मैं तेरे इश्क़ में

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत