IAS, IPS अधिकारी अडचणीत, कोट्यवधींचं घबाड हाती लागताच ACB कडून कारवाईसाठी पहिलं पाऊल, प्रशासनात खळबळ

राजस्थानमधील IAS, IPS अधिकारी अडचणीत सापडले आहेत. कोट्यवधींचं घबाड हाती लागताच ACB कडून कारवाईसाठी पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे.

IAS, IPS अधिकारी अडचणीत, कोट्यवधींचं घबाड हाती लागताच ACB कडून कारवाईसाठी पहिलं पाऊल, प्रशासनात खळबळ
IAS agrawal news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 1:54 PM

राजस्थानचे एक आयएएस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीयांचं प्रॉपर्टी डील प्रकरण समोर आलं आहे. दोन अधिकाऱ्यांनी पदाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.  पदाचा गैरवापर करून एका कंपनीला फायदा मिळवून दिला. त्यानंतर दोन रिसॉर्ट्समध्ये 40 व्हिला आणि कॉटेजची कथित खरेदी केली. त्यानंतर त्याच कंपनीला भाडेतत्वावर दिल्याचा आरोप आहे. या माध्यमातून दरवर्षी 1.8 कोटी रुपयांची कमाई व्हायची. या प्रकरणी राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईसाठी पहिलं पाऊल टाकलं आहे.

या प्रकरणात आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांची पत्नी आयपीएस प्रशाखा माथूर चर्चेत आल्या आहेत. यामुळे शिखर अग्रवाल यांची बदली रोखण्यात आली आहे. तसेच प्रशाखा माथूर यांचीही बदली रोखण्यात आली आहे.  दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात प्राथमिक पुरावे हाती लागले आहेत. त्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading...

काय आहे आरोप?

आरोप असा आहे की, अग्रवाल यांनी वेगवेगळ्या सरकारी पदावर असताना रिसॉर्ट बांधण्यात सूट दिली. त्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करताना मंजुरी दिली. त्या बदल्यात त्यांना विशेष आर्थिक पॅकेज देखील देण्यात आलं.  त्यांच्या निर्णयाने राज्य सरकारला आर्थिक नुकसान झालं आहे.  आता राज्य सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 अ अंतर्गत सविस्तर चौकशीला मंजुरी दिली आहे. एसीबीच्या तपासानुसार, अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सप्टेंबर 2023 ते मार्च 2026 उदयपूरमधील बुझडा, अलवरच्या अजबगडमध्ये दोन अनंता रिसॉर्टमध्ये 40 मालमत्ता खरेदी केल्यात. त्याचं मूल्य एकूण 6.16 कोटी रुपये इतकं आहे.

अधिकाऱ्यांनी उदयपूरमध्ये वीस कॉटेज,  तर मार्च 2026 मध्ये अलवर रिसॉर्टमध्ये 20 व्हिला खरेदी करण्यात आलेत. या मालमत्ता अग्रवाल यांच्यासहित कुटुंबातील विविध सदस्यांच्या नावावर आहेत. एसीबीच्या म्हणण्यांनुसार,  उदयपूरमध्ये अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 10 व्हिला खरेदी करण्यात आलेत. अलवरमधील प्रॉपर्टी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. व्हिला बाजारभावापेक्षा खूपच कमी खरेदी केल्याचा एजन्सीला संशय आहे. आता आयएएस शिखर अग्रवाल यांनी आणखी कुठे मालमत्ता दडवून ठेवली आहे का, याची चौकशी एसीबी चौकशी करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us