Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

Vikram 1 Launch : भारतीय अवकाश क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. हैदराबादच्या स्कायरुट एअरोस्पेसने शनिवारी भारताचं पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 लॉन्च केलं.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग
Skyroot
Image Credit source: Skyroot Aerospace
| Updated on: Jul 18, 2026 | 12:51 PM

अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची खासगी कंपनी स्कायरुट एअरोस्पेसने आज एक मोठं यश मिळवलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन विक्रम-1 रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च केलं. भारताच्या खासगी क्षेत्रातील हे पहिलं ऑर्बिटल रॉकेट लॉन्चिंग आहे. सगळ्या देशाला यावर अभिमान आहे. विक्रम-1 रॉकेट सकाळी 11.30 वाजता लॉन्च करण्यात आलं. रॉकेट निर्धारित सर्व टप्पे पूर्ण केले. रॉकेटद्वारे उपग्रह ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आला आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी लॉन्चिंगची ही सर्व प्रक्रिया मॉनिटर केली. ‘आगमन’ असं या मिशनचं नाव ठेवण्यात आलं आहे.

ही लॉन्चिंग फक्त स्कायरुटसाठी नाही, तर भारताच्या सगळ्या प्रायवेट सेक्टरसाठी मोठी संधी आहे. वर्ष 2020 मध्ये सरकारने स्पेस सेक्टरमध्ये अनेक बदल केले. त्यानंतर खासगी कंपन्यांना रॉकेट, सॅटलाइट आणि लॉन्च सर्विसवर काम करण्याची संधी मिळाली. स्कायरुटने यापूर्वी 2022 साली विक्रम-S नावाने सब-ऑर्बिटल रॉकेट लॉन्च केलं आहे. त्या मिशनमध्ये उपग्रह ऑर्बिट मध्ये पाठवला नव्हता. यावेळी लक्ष्य वेगळं होतं. विक्रम-1 अनेक ग्राहकांच्या छोट्या सॅटलाइट्सना पृथ्वीपासून 450 किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिट कक्षेत स्थापित करेल. हे तीन डेवलपमेंटमधील पहिलं मिशन आहे. यानंतर रॉकेटला नियमित कमर्शियल लॉन्चसाठी तयार केलं जाईल.

विक्रम-1 रॉकेटची खासियत काय?

विक्रम-1 चार टप्प्यातील रॉकेट आहे. पहिल्या तीन टप्प्यात ठोस इंधनाचा वापर करण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात लिक्विड फ्यूल इंजिन आहे. गरज पडल्यानंतर ते पुन्हा चालू केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपग्रहाला ठरवलेल्या ऑर्बिटमध्ये अजून योग्य ठिकाणी पोहोचवायला मदत मिळते. हे रॉकेट खासकरुन छोटे सॅटलाइट्स लॉन्च करण्यासाठी बनवलं आहे.

हे यश इतकं मोठं का?

सब-ऑर्बिटल आणि ऑर्बिटल रॉकेटमध्ये मोठा फरक असतो. सब-ऑर्बिटल रॉकेट अवकाशात जाऊन परत येतं. पण ऑर्बिटल रॉकेट सॅटेलाइटला इतकं वेग देतं की, ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतं. विक्रम-1 चं यश मोठं यासाठी आहे, कारण हे भारताच्या एका खासगी कंपनीने बनवलेलं रॉकेट आहे.

Follow Us