कबड्डी खेळाडूंना टॉयलेटमध्ये  जेवण दिले; अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार

| Updated on: Sep 20, 2022 | 8:21 PM

जेवण तयार केल्यानंतर ते शौचालयात ठेवण्यात आले. टॉयलेटच्या फरशीवर भाताची प्लेट ठेवली आहे. तर जमानीवर कागद पसरवून त्यावर पुऱ्या ठेवण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

कबड्डी खेळाडूंना टॉयलेटमध्ये  जेवण दिले; अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार
टॉयलेटमध्ये खेळाडूंना जेवण दिल्याने 'गब्बर' संतप्त, म्हणाला...
Follow us on

लखनौ : अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार उत्तर प्रदेशात( Uttar Pradesh) घडला आहे. कबड्डी खेळाडूंना टॉयलेटमध्ये(toilet) जेवणा देण्यात आले आहे. खेळाडूंसह करण्यात आलेल्या निष्काळजीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत खेळाडू टॉयेटमध्येच जेवणाची प्लेट हातात घेऊन असल्याचे दिसत आहे.

लखनौजवळील सहारनपूरच्या आंबेडकर स्पोर्ट्स स्टेडियममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरमध्ये आलेल्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये करण्यात आली होती.

शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली आहे.

मात्र, या व्यवस्थेत निष्काळजीपणाचा कहर पहायला मिळाला आहे. अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

स्टेडियममधील स्विमिंग पूलच्या आवारात उघड्यावरच जेवण तयार करण्यात आले. चेंजिंग रूम आणि टॉयलेटमध्ये धान्य आणि जेवणाचे साहित्य ठेवण्यात आले होते.

जेवण तयार केल्यानंतर ते शौचालयात ठेवण्यात आले. टॉयलेटच्या फरशीवर भाताची प्लेट ठेवली आहे. तर जमानीवर कागद पसरवून त्यावर पुऱ्या ठेवण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

विद्यार्थी टॉयलेटमध्ये येवून जेवणाची प्लेट घेत आहेत. हे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून टॉयलेटमध्ये जेवण दिले जात असल्याचे जेवणाची इच्छा मेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उत्तर प्रदेशच्या क्रीडा निदेशालयाच्या देखरेखीखाली उप्र कबड्डी असोसिएशनतर्फे डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियमवर राज्यस्तरीय सब-ज्युनियर मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये 16 विभागातील संघ आणि एक क्रीडा वसतिगृहाचे एकूण 17 संघ सहभागी होत आहे.