Saurabh Sharma Case: शिपाईच्या घरी कुबेरचा खजिना, डायरीतून उघडले 100 कोटींचे रहस्य, आयकर विभागाने उघडली कुंडली

Saurabh Sharma Case Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एक पत्रानंतर सौरभ शर्मा प्रकरणाचा तपास सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. नितीन यांनी 16 जुलै 2022 रोजी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्य सचिव इकबाल सिंह बैस यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात मध्य प्रदेशातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करत असल्याचे म्हटले होते.

Saurabh Sharma Case: शिपाईच्या घरी कुबेरचा खजिना, डायरीतून उघडले 100 कोटींचे रहस्य, आयकर विभागाने उघडली कुंडली
सौरभ शर्मा
| Updated on: Dec 24, 2024 | 12:27 PM

Saurabh Sharma Inside Story: आरटीओ विभागात शिपाई म्हणून नोकरी…पगार 40 हजार…फक्त सात वर्ष नोकरी…त्यानंतर जमवली कोट्यवधींची माया. अगदी धनकुबेर म्हणावे इतकी संपत्ती. लोकायुक्त अन् आयकर विभागाच्या छाप्यात 10 कोटींची रोकड, 52 किलो सोने, 250 किलो चांदी मिळाली. ही काहणी एखाद्या चित्रपटातील नाही. मध्य प्रदेशातील आरटीओ विभागात कधी शिपाई असलेल्या सौरभ शर्मा याने जमवली ही बेहिशोबी संपत्ती आहे. ही संपत्ती म्हणजे हिमनगाचे टोक म्हणावे लागले. अजून बरेच ‘राज’ त्याचे उघडणार आहे. आयकर विभागाच्या हातात आता त्याची एक डायरी आली आहे. त्या डायरीत मध्य प्रदेश आरटीओ विभागातील अनेक जिल्ह्यांच्या आरटीओची नावे आणि नंबर आहेत. त्यांना मिळणाऱ्या रक्कमेची माहिती आहे. अगदी डिसेंबर महिन्याचाही हिशोब त्यात आहे. कोण आहे हा सौरभ शर्मा?, कशी जमवली त्याने ही प्रचंड संपत्ती? पाहू या इनसाईड स्टोरी… अनुकंपावर आरटीओ विभागात कॉन्सेबल मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील सामान्य परिवाराशी संबंध ठेवणारा आरटीओचा माजी कॉन्टेबल...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा