AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नेत्यानं शकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
शरद पवार गटाला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 7:48 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष  धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी अजित  पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. धनंजय पिसाळ हे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे गटनेते देखील होते. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केल्यानं हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. धनंजय पिसाळ यांचा वार्ड हा युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गेल्यामुळे ते पक्षावर नाराज झालं, त्यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका मनीषा राहाटे या देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी युती 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं मनसे आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला या निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?