देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जातोय. देशाला खूप परिश्रम आणि यातना सोसून, संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. देशाच्या लाखो नागरिकांनी अतिशय संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्यामुळे आजचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशासाठी जास्त महत्त्वाचा आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवला जात आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यावेळी काय बोलणार? याकडे देशाचं विशेष लक्ष असणार आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वात देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार देशात स्थापन झालं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदोत्सवात न्हाऊन निघणार आहे.
पिंपरी चिंचवड : पार्थ पवार यांच्याकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात झालीय. भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना आमदार करून दाखवणार, असं पार्थ पवारांनी वक्तव्य केलं आहे. पार्थ पवार यांच्या या वक्तव्यामुळे जागा वाटपाआधी पार्थ पवार यांच्याकडून पक्षातील कार्यकर्त्यांना बळ की महायुतीला आव्हान? अशा चर्चेला उधाण आलं.
सोलापूर : करमाळा शहरात 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदू मुस्लिम एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत 300 फूट तिरंगा ध्वजाची मिरवणूक करमाळा शहरातून काढण्यात आली.सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी हिंदू मुस्लिम एकता रॅलीचे आयोजन केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतून पुणे महापालिका आयुक्त यांना फोन लावला. वडगाव शेरी भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरुन अजित पवारांनी आयुक्तांना फोन केल्या. तसेच भटक्या कुत्र्यांवर तातडीने ठोस पावले उचला, अशा सूचना अजित पवार यांनी आयुक्तांना दिल्या. या बैठकीत एका नागरिकाने त्यांच्या सोसायटी मध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे सेनापती असून त्यांनी बारामतीतूनच निवडणूक लढवावी, असं म्हटलंय. तसेच शरद पवार गटाच्या खासदार याच्यावर टीका केली आहे. अजित पवार आमचे सेनापती आहेत आणि त्यांनी बारामतीतुनच निवडणूक लढवावी. जय पवार सारख्या नव्या नेतृवाला संधी मिळावी म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केले असेल, असा अंदाज चाकणकर यांनी व्यक्त केला. तसेच सुप्रिया सुळे या महिलाद्वेषी आहेत, एकीकडे लाडकी बहीण योजनेवर टीका करायची आणि दुसरीकडे आपल्या मतदारसंघात योजना राबवायची, सुप्रिया सुळेंचा हा दुटप्पीपणा असल्याचं चाकणकर म्हणाल्या.
78 व्या स्वातंत्र्यदिनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले की, आसामचे भविष्य सुरक्षित नाही. हिंदू-मुस्लिम लोकसंख्येचा समतोल झपाट्याने नष्ट होत आहे. आसामचे मुख्यमंत्री सीएम सरमा यांनी हिंदू आणि मुस्लिमांना कुटुंब नियोजनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, त्यांनी प्रत्येकाला बहुपत्नीत्वाविरोधात जनजागृती करण्याची विनंती केली.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आंदोलक डॉक्टर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले की, तुम्हाला न्याय मिळेल. मी तुमचं ऐकण्यासाठी येथे आलो आहे. आम्ही हे लढू आणि जिंकू. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी स्वतःला तुमच्या सेवेत समर्पित करीन.
कोलकाता : सीबीआयचे पाच सदस्यीय पथक महिला डॉक्टरच्या घरी पोहोचले आहे. या संघात दोन महिला आणि तीन पुरुष सदस्यांचा समावेश आहे. सीबीआयची टीम महिला डॉक्टरच्या पालकांशी बोलण्यासाठी आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलाची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने अपने आवास पर पेरिस ओलंपिक 2024 में भाग लेने वाले भारतीय दल से मुलाकात की। pic.twitter.com/Qyd1zM20N7
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2024
ज्यांना पोटदुखी झाली आहे ते आमच्या चांगल्या योजनेवर टीका करीत आहेत असा पलटवार राष्ट्र्वादीचे नेते प्रफुल पटेल यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना केला आहे.
माय माउली यांच्यासाठी चांगली योजना आणायची हे आम्ही ठरवलं होतं. अदिती यांचा फोन आला की ३५ लाख महिलांना त्यांच्या बँकेत पैसे पोहचले.आम्ही महिलांवर उपकार करत नाहीत आमची जबाबदारी पार पाडायची आहे असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात असंख्य महिलांच्या खात्यात पैसे जमा. दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच वेळी खात्यात जमा. महिलांकडून सरकारचे आभार मानायला सुरुवात
केज मतदारसंघात हुकूमशाही सुरू आहे. या भागातील आमदार लोकांची अडवणूक करतात.अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अद्ययावत करा, अंबाजोगाईच्या सर्व्हे नंबर ७१ मध्ये आयटी पार्क करावा, केजमध्ये एम आय डी सी उभी करावी. मनोज जरांगे पाटलांमुळे बजरंग बप्पा सोनवणे खासदार झाले, असे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी म्हटले.
शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्याच्या केज येथे दाखल. यात्रेचे स्वागत खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले भव्य स्वागत. यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांचे जेसीबीच्या सहाय्याने भव्य हार घालून स्वागत.
ध्वजारोहणासाठी प्रफुल पटेल यांचा खास लुक. डोक्यावर निळी टोपी व खांद्यावर निळा गमचा…
आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात जातोय यात्रा घेऊन. आज राज्यपाल आपल्यात ध्वजारोहण करत असतात. मी पण उपस्थितीत होतो. भिडे वाडा प्लॅन फायनल झालं आहे ,आज ताबडतोब काम सुरू करू अस सागितले आहे,पायाभरणी करता येईल पण तोवर काम थांबले नाही पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
“आमच्यात कुठलाही वाद नाही. आम्ही सर्व एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय. माझी प्रचंड बदनामी केली जातेय की मी वेशभूषा बदलून जातो, नाव बदलून जातो. मी खुलं आव्हान दिलंय की कुठे गेलो ते सिद्ध करावा. मी कशाला माझं नाव बदलू? मला माझ्या नावाचा अभिमान आहे,” असं उत्तर अजित पवारांनी आरोपांवर दिलं आहे.
नवी दिल्ली- उद्धव ठाकरे हेच राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असतील. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नाही. निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना ही माहिती दिली. सोबतच INDIA आघाडीत असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत.
पुणे जिल्ह्यात आजपासून अजित दादा गटाची जनसन्मान यात्रा आहे. “भिडे वाड्याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. आता त्याचा प्लॅन अंतिम करण्यात आला आहे. मी त्यांना ताबडतोब काम सुरू करण्यास सांगितलं आहे. वरिष्ठांना बोलावून त्याची पायाभरणी करण्याचा विचार आहे. पण तोपर्यंत काम थांबू द्यायचं नाही”, असं अजित पवार म्हणाले.
पुणतांबा इथं रेल रोको आंदोलन सुरू असल्याने मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे कान्हेगाव इथं थांबवली. खबरदारी म्हणून शिर्डी जवळील कान्हेगाव इथं रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबवली आहे. पुणतांबा जंक्शनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी आंदोलकांची मागणी आहे.
रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांबा ग्रामस्थ आक्रमक झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आज रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत पुणतांबा ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी गावबंद ठेवलं आहे. मुंबई – शिर्डी वंदे भारतला आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर बंद झालेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्याची पुणतांबा ग्रामस्थांची मागणी आहे.
कोल्हापूर- स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. कृष्णा भीमराव पाटील या तरुणाे आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी झडप घातली. या घटनेनं जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेला पुणे जिल्ह्यात आजपासून सुरुवात होणार आहे. पुण्यातील सारसबाग गणपतीचे दर्शन घेऊन अजित पवार या यात्रेची सुरुवात करणार आहेत. ही जनसन्मान यात्रा आज वडगाव शेरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघात जाणार असून तेथे महिला मेळावे आणि कामगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण मधे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली असून भास्करराव जाधव यांचा रॅलीत सहभाग होता. मुंबई गोवा हायवे ते प्रांत कार्यालय परिसरात रॅली काढण्यात आली. मोठया संख्येने विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.
परंडा कंत्राटी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, काही कंत्राटी कामगार नगरपालिका बिल्डिंग वर चढले
परंडा नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई व पाणी पुरवठा अशा एकूण ४१ कामगारांचे नऊ महिन्यांचे मानधन थकित असून वारंवार मागणी करूनही मागणी मान्य न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हा आंदोलनाचा निर्णय घेतला . नगरपालिका कंत्राटी कर्मचारी आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनात महिला कर्मचारी यांचाही समावेश आहे. पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जोरदार तयारी सुरू. महायुतीच्या संयुक्त मेळाव्यास २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरपासून प्रारंभ होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार
संवाद यात्रांनाही सुरुवात होईल. राज्यात महायुतीचे ९ मोठे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ‘ एकजूट महाराष्ट्राच्या अभिमानाची, विकासाची, कल्याणाची’ अशी मेळाव्याची टॅगलाईन ठरवण्यात आली आहे.
मोदी अल्पमतातले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलंय. बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला. मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
लोकसभेत आम्ही मागे पडलो मात्र यंदा विधानसभेत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा हिस्सा हा उत्तर महाराष्ट्राचा असेल , उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रतिनिधी हे जिंकून येतील असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.
लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले. बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
40 कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं. 40 कोटी लोक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर 140 कोटी देशवासीय, नागरिकांनी ठरवलं, संकल्प केला तर कितीही आव्हानं आली, कितीही कमतरता असल्या, कितीही साधनांसाठी लढा द्यावा लागला तरी सर्व संकटं पार करून आपण समृद्ध भारत, 2047 सालच्या विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केला.
देशाच्या अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षांत मोठी उंची गाठली. अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील स्वातंत्र्य दिनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले. देशातील लाखो लोकांनी विकसीत भारताविषयीचे काय स्वप्न आहे, त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. मला हे सांगताना आनंद होत आहे की, विकसीत भारतासाठी कोट्यवधी देशवासीयांनी सूचना केल्या. त्यांची अमूल्य मते मांडली. आपल्या देशातील जनतेची विचार शक्ती मोठी आहे. त्यांची स्वप्न मोठी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा यांच्यासह लोकनेते आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला..
सेक्युलर सिविल कोड वेळेची गरज आहे. धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे. परिवारवाद आणि जातीयवादातून मुक्ती आवश्यक आहे. चुकीच्या कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही असं पीएम मोदी म्हणाले.
“बांग्लादेशात जे काही झालय. त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. खासकरुन 140 कोटी देशवासियांना चिंता आहे. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहोत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमच शुभचिंतन राहील” असं पीएम मोदी म्हणाले.
“भारत बेस्ट क्वालिटीसाठी ओळखला गेला पाहिजे. विश्वासाठी डिझायनिंग इंडियावर भर द्यायचा आहे. इंडियन स्टँडर्ड आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड बनलं पाहिजे. ते उत्पादनाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, क्वालिटीवर भर द्यावा लागेल. डिझायनिंग क्षेत्रात बरच काही नवीन देऊ शकतो. आज गेमिंगच खूप मोठ मार्केट आहे. आजही गेमिंगवर प्रभाव विदेशी कमाई होते. भारताकडे खूप मोठी विरासत आहे. गेमिंगमध्ये नवीन टॅलेंट आहे. विश्वातील मुलांना गेमिंगकडे आकर्षित करु शकतो. भारताचे युवा, आयटी प्रोफेशनल, AI प्रोफेशन्लसनी गेमिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. खेळण्यावर नाही, तर आपली गेमिंग उत्पादन जगात पोहोचली पाहिजेत. एनिमेशनमध्ये धाक निर्माण करु शकतो” असं पीएम मोदी म्हणाले.
“आधी खेळणी बाहेरुन यायची. आता देशात बनलेली खेळणी परदेशात जातात. आधी मोबाईल फोन आयात करायचो. आता निर्यात करतो. ही भारताची ताकद आहे. सेमी कंडक्टर मिशनवर काम सुरु केलय. टॅलेंट आहे. सेमी कंडक्टरच उत्पादन भारतात होणार. 2 G साठी संघर्ष करायचो. आज 5 G देशात वेगाने रोलआऊट झाला. आम्ही इथे थांबणार नाही. 6 G वर आता काम करतोय. डिफेन्स सेक्टरमध्ये बजेट कितीही असो, ते परदेशातील खरेदीवर खर्च व्हायचं. आज सैन्याने हजारो गोष्टींची यादी बनवली आहे, त्या वस्तू परदेशातून मागवणार नाही. आपणच त्याचं उत्पादन करणार आहोत. संरक्षण उत्पादनात भारताची ओळख बनली आहे. आधी संरक्षणासाठी छोट्या-मोठ्या गोष्टी बाहेरुन आणायचो. पण आता त्याच वस्तू निर्यात करतो. हळूहळू संरक्षण उत्पादन क्षेत्रात आपण पुढे जातोय” असं पीएम मोदी म्हणाले.
“भारत सरकारने संशोधनासाठी सपोर्ट वाढवला आहे. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन बनवलं आहे. बजेटमध्ये 1 लाख कोटी रुपये रिसर्चसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या युवकांकडे ज्या कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात येऊ शकतील. मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यात आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. दरवर्षी 25 हजार युवांना मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे” असं पीएम मोदी म्हणाले.
माझे 140 कोटी देशवासिय तुम्ही जो आशिर्वाद दिलाय. त्यात एकच संदेश आहे, जन-जनची सेवा. नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायचं आहे. आज नवीन शिक्षा निती आणली आहे, जी 21 व्या शतकाच्या अनुरुप आहे. माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज लागू नये अशी शिक्षा नितीवर काम करत आहोत असं पीएम मोदी म्हणाले.
आज देश आकांक्षांनी भरलेला आहे. देशाच्या युवापिढीला नवीन शिखरं सर करायची आहे. म्हणून प्रत्येक सेक्टरला गती द्यायचा प्रयत्न आहे. नवीन सेक्टरमध्ये संधी निर्माण करायच्या आहेत. नागरिकांच्या मुलभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. समाज आज विश्वासाने भरलेला आहे. प्रति व्यक्ती आय दुप्पट करण्यात यशस्वी झालोय. भारताची निर्यात सतत वाढतेय. परकीय चलनसाठा वाढत आहे. आधीपेक्षा दुप्पट झाला आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. भारतीच दिशा योग्य आहे, गती आहे. स्वप्नांमध्ये सामर्थ्य आहे. यासोबतच आपल्यामधली संवेदनशीलता ऊर्जा, चेतना निर्माण करते असं पीएम मोदी म्हणाले.
मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. मी स्वप्न बघितलय 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल असं पीएम मोदी म्हणाले.
“स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. त्याबरोबर दोन गोष्टी अजून झाल्या. त्यामुळे विकासाला गती मिळाली. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिलाय” असं पीएम मोदी म्हणाले.
During his #IndependenceDay2024 speech, PM Modi says, “Be it tourism, education, health, MSME, transport, farming and agriculture sectors- in every sector a new modern system is being created. We want to move forward by adopting best practices by integration of technology.”… pic.twitter.com/TNUUlcSSy0
— ANI (@ANI) August 15, 2024
“बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आम्ही गर्व्हन्सच हे मॉडल बदललं. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातय” असं पीएम मोदी म्हणाले.
“2047 पर्यंत विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या आहेत. माझ्या देशवासियांनी हे सुचवलं आहे, म्हणून मी ते वाचलं. देशवासियांची इतकी मोठी स्वप्न आहेत. देशवासियांचा हा विश्वास अनुभवातून आला आहे. लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले.
“आज आपण 140 कोटी आहोत. जर 40 कोटी भारतीय गुलामीची बेडी तोडू शकतात. 40 कोटी लोक स्वातंत्र्याच स्वप्न पूर्ण करु शकतात, तर 140 कोटी लोक संकल्प घेऊन निघाले, एक दिशा ठरवून निघाले, तर आव्हान कितीही असोत, प्रत्येक आव्हानाला पार करुन समृद्ध भारत बनवू शकतो 2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो” असं पीएम मोदी म्हणाले.
नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे, असं पीएम मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं आहे. आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले असून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींच स्वागत केलं. आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची पीएम मोदी यांची 11 वी वेळ आहे.
Independence Day 2024: PM Modi arrives at Rajghat, pays tribute to Mahatma Gandhi
Read @ANI Story | https://t.co/GTKiWsxRVA#IndependenceDay2024 #PMModi #Rajghat #RedFort pic.twitter.com/dPyzGGO2RT
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2024
पीएम मोदी राजघाटवर पोहोचले आहेत. त्यांनी इथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदी त्यानंतर लाल किल्ल्यावर रवाना होतील. तिथे लाल किल्ल्याच्या प्राचीरवरुन देशाला संबोधित करतील.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते कुमार स्वामी सुद्धा सहभागी होण्यासाठी लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेलं भारताचं ऑलिम्पिक पथक 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाल किल्ल्यावर रवाना झालं आहे.
पीएम मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असं त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की ढेरों शुभकामनाएं। जय हिंद!
Independence Day greetings to my fellow Indians. Jai Hind! 🇮🇳
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2024
देशासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. ब्रिटिशांनी आजच्याच दिवशी भारत देश सोडून पलायन केलं होतं. ब्रिटश सरकारने भारतीय नागरिकांवर खूप जुलूम आणि अत्याचार केले होते. त्या अत्याचारांच्या विरोधात भारताच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता. त्यामुळे आपण आज देशात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. आजचा दिवस देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीत लाल किल्ल्यावर भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी मोदी आपल्या भाषणात देशासाठी काही मोठी घोषणा करतात का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
इंदापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना उजनी धरणावर लेजर शो करून पाण्यावर केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.