स्वातंत्र्य दिन 2025
15 ऑगस्ट, 1947 हा भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र बनलो. सुरुवातीला, ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी 30 जून, 1948 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, देशातील वाढती अस्थिरता आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे ही तारीख पुढे ढकलण्याची गरज भासली. त्यामुळे, 3 जून 1947 रोजी भारताचे शेवटचे व्हॉइसराय लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक नवी योजना मांडली. त्यात, 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारतला स्वातंत्र्य देणे, ब्रिटिश भारतचे विभाजन करून भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करणे, दोन्ही देशांना स्वायत्तता आणि संप्रभुता देणे आणि भारतातील संस्थाने कोणत्या देशात विलीन होतील, हा निर्णय त्यांना स्वतःला घेण्याचा अधिकार देणे आदीचा समावेश होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 4 जुलै 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी इंडियन इंडिपेंडन्स बिल मांडलं. माउंटबॅटन योजनेला ब्रिटिश संसदेची मंजूरी मिळाली आणि 4 जुलै 1947 रोजी इंडियन इंडिपेंडेंस बिल मंजूर करण्यात आले. या बिलाद्वारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
Independence Day : विराट कोहली स्वातंत्र्य दिनी अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय
विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत. मात्र विराटने केलेली एक खास कामगिरी आतापर्यंत कोणत्याच दुसऱ्या भारतीय खेळाडूला करता आलेली नाही. विराटने नक्की असं काय केलंय? जा
- sanjay patil
- Updated on: Aug 16, 2025
- 2:26 am
Independence Day: 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर फडकतो तिरंगा, पाकिस्तानचा ध्वज कुठे फडकवतात?
Independence Day: भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान त्याचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात. पाकिस्तानमध्ये त्यांचा ध्वज कोणत्या मुख्य वास्तूमधून फडकवल्या जातो, माहिती आहे का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 15, 2025
- 3:11 pm
संभाजीनगरातील ‘मनपा’ इमारत स्वतंत्र दिनानिमित्त ‘तिरंगा’मय
स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मनपाच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. देशाचा स्वातंत्र्य दिन असल्याने याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकाच्या इमारतीवर आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्या रंगाच्या रोषणाईमुळे महापालिकेची इमारत उजळून निघाली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 15, 2025
- 12:29 pm
PM Narendra Modi : इंदिरा गांधींचा तोडला तो रेकॉर्ड; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास
Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पेक्षा याबाबतीत मागे आहे. त्यांनी आर्यन लेडी इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड तोडला आहे. आज दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून त्यांनी अनेक मुद्दावर स्पष्ट मत मांडले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 15, 2025
- 11:47 am
PM Modi : 2014 ते 2025… सलग 12 व्यांदा लालकिल्ल्यावरून मोदींचं देशाला संबोधन, यंदा तब्बल 103 मिनिटं भाषणं, कोणत्या वर्षी किती मिनिटं बोलले?
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यंदा मोदींनी १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केले. जे १०३ मिनिटे चालले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणाऱ्या पंतप्रधानांमध्ये पंतप्रधान मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 15, 2025
- 11:52 am
PM Modi : गूडन्यूज.. सरकारकडून तरूणांना 15 हजार; विकासित भारत रोजगार योजना आजपासून सुरू
जीएसटीच्या आढाव्यासोबतच पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना पहिली नोकरी मिळाल्यावर १५,००० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 15, 2025
- 9:56 am
PM Modi : यंदाच्या दिवाळीला देशवासियांना बंपर गिफ्ट, लाल किल्ल्यावरून मोदींची मोठी घोषणा काय?
यंदाच्या दिवाळीत मी तुमची दिवाळी दुप्पट करणार आहे. या दिवाळीत तुम्ही देशवासीयांना खूप मोठी भेट देणार आहात. जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यामुळे एमएसएमई आणि लघु उद्योजकांना मोठा फायदा होईल आणि दैनंदिन वस्तू खूप स्वस्त होतील.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 15, 2025
- 9:28 am
PM Modi Full Speech: ऑपरेशन सिंदूर, विकसित भारत, RSS चं कौतुक अन् पाकला इशारा, लाल किल्ल्यावरून मोदींनी काय-काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सलग १२ व्या वेळी ध्वजारोहण केले. तसेच, एमआय-१७ हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. बघा मोदींचे पूर्ण भाषण
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 15, 2025
- 10:12 am
कुणी दागिने दिले, तर कुणी कोठा सोडला, संजय दत्तच्या आज्जीने तर… स्वातंत्र्यातील वेश्यांचं योगदान माहीत आहे काय?
स्वातंत्र्य चळवळीत वेश्यांनी खूप मोठं योगदान दिलं. पण त्यांचा इतिहास म्हणावा तसा लिहिला गेला नाही. त्यांना पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. प्रसिद्धी दिली गेली नाही. त्यांच्याबाबतचं एखादं टपाल तिकीट किंवा स्मारकही काढलं गेलं नाही.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 15, 2024
- 6:23 pm
देशाला स्वातंत्र मिळून 77 वर्ष, पण महाराष्ट्रातील हा रेल्वे ट्रॅक अजूनही इंग्रजांकडे, ब्रिटीश कंपनीला द्यावी लागते कोट्यवधींची रॉयल्टी
India only private railway line: देशाला स्वातंत्र मिळून आता 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु अजूनही महाराष्ट्रात असलेला रेल्वे ट्रॅकवर ब्रिटीश कंपनीचे नियंत्रण आहे. त्यामुळे ब्रिटनच्या त्या कंपनी कोट्यवधीची रॉयल्टी द्यावी लागते. हा रेल्वे ट्रॅक खरेदी करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले, मात्र याला यश आले नाही.
- Jitendra Zavar
- Updated on: Aug 15, 2024
- 4:06 pm
Independence Day 2024 : भारताशिवाय ‘हे’ देशही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून करतात साजरा, मोठी यादी आणि…
78th Independence Day : आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. दोन दिवसांपासूनच लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. आज अनेक ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. लोक सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.
- शितल मुंडे
- Updated on: Aug 15, 2024
- 2:20 pm
15 ऑगस्ट या तारखेलाच का मिळाले भारताला स्वातंत्र? भविष्यवाणी, ज्योतिषशास्त्र की आणखी काही कारण
independence day: भारताला स्वातंत्र देण्यासाठी मी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार करत होतो. परंतु 15 ऑगस्ट ही तारीख अचानक माझ्या डोक्यात आली. कारण दुसऱ्या महायुद्धात या दिवशी जापानने आत्मसमर्पण केले होते. त्याला दोन वर्ष पूर्ण झाले होते.
- Jitendra Zavar
- Updated on: Aug 15, 2024
- 2:00 pm