PM Modi : 2014 ते 2025… सलग 12 व्यांदा लालकिल्ल्यावरून मोदींचं देशाला संबोधन, यंदा तब्बल 103 मिनिटं भाषणं, कोणत्या वर्षी किती मिनिटं बोलले?
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यंदा मोदींनी १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केले. जे १०३ मिनिटे चालले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणाऱ्या पंतप्रधानांमध्ये पंतप्रधान मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा देशाला संबोधित केले आहे. दरम्यान, यंदा लाल किल्ल्यावरून सर्वात लांबलचक आणि रेकॉर्ड ब्रेक भाषण करण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्यात आला आहे. या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना लाल किल्ल्यावरून एकूण तब्बल १०३ मिनिटांचं भाषण दिले आहे. लाल किल्ल्यावरून कोणत्याही पंतप्रधानांनी आतापर्यंत एवढे मोठे भाषण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्यात आलाय. यापूर्वी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींनी ९८ मिनिटांचे भाषण दिले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा राष्ट्राला संबोधित करून इंदिरा गांधींचा विक्रम मोडला आहे अशाप्रकारे, पंतप्रधान मोदी जवाहरलाल नेहरूंनंतर दुसऱ्या क्रमांकावर असून ज्यांनी सलग १७ वेळा स्वातंत्र्यदिनी भाषणं केली होती. बघा कोणत्या वर्षी किती मिनिटांचं भाषण केले?
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

