PM Modi : 12 वर्षांत पहिल्यांदाच मोदींकडून RSS चं कौतुक, राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या सेवेबद्दल म्हणाले…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षांच्या समर्पणाचा इतिहास आहे. १०० वर्षांच्या राष्ट्रीय सेवेत योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आदरपूर्वक स्मरण करतो.
देशभरात ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाषणाद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कौतुक करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी संघाचा औपचारिक उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पाहायला मिळालं. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून संबोधित करताना मोदींनी आरएसएसचं कौतुक करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षे अतिशय अभिमानाने देशाची सेवा केली आहे. पुढे मोदी म्हणाले, ‘आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना जन्माला आली. राष्ट्राची १०० वर्षे सेवा करणे हे खूप अभिमानास्पद आहे. वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्र उभारणीच्या संकल्पाने, भारतमातेच्या कल्याणाच्या उद्देशाने मातृभूमीसाठी १०० वर्षे समर्पित जीवन, सेवा, समर्पण, संघटन आणि अतुलनीय शिस्त ही त्याची ओळख आहे. अशी आरएसएस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे.’
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

