Independence Day 2024 : भारताशिवाय ‘हे’ देशही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून करतात साजरा, मोठी यादी आणि…

78th Independence Day : आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. दोन दिवसांपासूनच लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. आज अनेक ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. लोक सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

Independence Day 2024 : भारताशिवाय 'हे' देशही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून करतात साजरा, मोठी यादी आणि...
Independence Day
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 2:20 PM

आज संपूर्ण भारतामध्ये 15 ऑगस्ट जल्लोषामध्ये साजरा केला जातोय. आज 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतरच्या स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक वेळी स्वातंत्र्याची नवी अनुभूती देतो. 15 ऑगस्ट 1947 ही तारीख भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास सांगितली जाते. आज सर्वत्र देशभक्तीचे गाणे आणि झेंडे लावल्याचे बघायला मिळतंय. शाळेंमध्येही जल्लोषामध्ये मुलांनी स्वातंत्र्यदिन साजरा केलाय. एक वेगळाच उत्साह आज लोकांमध्ये बघायला मिळतोय. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचीही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. 

15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून फक्त भारतामध्येच नाही तर अजूनही काही इतर देशांमध्येही साजरा केला जातो. म्हणजेच काय तर आजच्या दिवशी काही इतर देशांनाही गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. तेथील नागरिकांमध्येही आज जल्लोषाचे वातावरण हे बघायला मिळतंय. चला तर मग जाणून घेऊया हे देश नेमके कोणते आहेत.

काँगो

आफ्रिकन देश काँगो येथे देखील 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. 1880 मध्ये फ्रान्सने काँगोला गुलाम बनवले. येथे फ्रान्सचे राज्य होते. 15 ऑगस्ट 1960 मध्ये फ्रान्सने आपले सैन्य काँगोमधून काढून घेतले आणि तेंव्हापासूनच काँगोला मुक्त झाला आणि 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून तिथे साजरा केला जातो. 

लिंकटेस्टिन

लिंकेस्टिन देशामध्येही आजच स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. हा देश जगातील सर्वात लहान समजल्या जाणाऱ्या देशांपैकी एक आहे. या देशावर जर्मनीचे राज्य होते. या देशाला 1866 मध्ये जर्मनीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि म्हणून हा देश 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया 15 ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात. हे दोन्ही देश हा दिवस राष्ट्रीय मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियावरील जपानी वसाहत संपुष्टात आली. जपानी वसाहत सुमारे 35 वर्षे टिकली. या 35 वर्षानंतर कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले.

बहरीन

15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन मानत नसला तरी बहरीन देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. बहरीनचे तत्कालीन शासक ईशा बिन सलमान अल खलिफा यांनी ज्या दिवशी सत्ता हाती घेतली, बहरीनने राष्ट्रीय स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित केले आणि हा दिवस 16 डिसेंबर होता. मात्र, बहरीन देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी खरे स्वातंत्र्य मिळाले आहे. 

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....