PM Narendra Modi : इंदिरा गांधींचा तोडला तो रेकॉर्ड; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास
Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पेक्षा याबाबतीत मागे आहे. त्यांनी आर्यन लेडी इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड तोडला आहे. आज दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून त्यांनी अनेक मुद्दावर स्पष्ट मत मांडले.

Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावर पोहचताच एक नवीन रेकॉर्ड केला. त्यांनी सलग 12 व्यांदा स्वांतत्र्यदिनी भाषण केले. त्यांनी किती वेळ भाषण केले, त्याचाही रेकॉर्ड केला. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा भाषणाचा हा रेकॉर्ड मोडला आहे. आर्यन लेडी गांधी यांनी 11 वेळा 15 ऑगस्ट रोजी देशाला संबोधीत केले होते. आता मोदी याबाबतीत केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा मागे आहेत. पंडित नेहरू यांनी सलग 17 वेळा स्वातंत्र्य दिनी देशाशी संवाद साधला होता.
पंडित नेहरूंपेक्षा मागे
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 आणि नंतर जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 या काळात एकूण 16 वेळा 15 ऑगस्ट रोजी भाषण करण्यात आले. त्यातील 11 भाषण त्यांनी सलग दिले होते. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1947 पासून ते 1963 पर्यंत 17 वेळा राष्ट्राला संबोधित केले. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1964 आणि 1965 या काळात दोनदा लाल किल्ल्यावरून भाषण दिले होते.
अजून केला एक मोठा विक्रम
पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधण्यातही नवीन विक्रम केला. लाल किल्ल्यावरून त्यांनी लांबलचक भाषण देण्याचा नवीन रेकॉर्ड केला. यापूर्वीचा त्यांचाच रेकॉर्ड त्यांनी तोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 103 मिनिटांचे भाषण केले. यापूर्वी त्यांनी 98 मिनिटांचे भाषण केले होते. गेल्यावर्षी 2024 मध्ये त्यांनी हे दीर्घ भाषण केले होते. यंदा त्यापेक्षा त्यांनी 7 मिनिटे अधिक संवाद साधला.
पंडित नेहरूंचा तो रेकॉर्डही मोडला
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 72 मिनिटे भाषण केले होते. हा तेव्हाचा एक विक्रम होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये हा रेकॉर्ड मोडला. त्यांनी 88 मिनिटांचे भाषण केले होते. त्यानंतरही मोदींनी अनेकदा दीर्घ भाषणं केली. आता त्यांनीत त्यांचाही विक्रम मोडीत काढला. यंदा त्यांनी 103 मिनिटांचं भाषण केलं. त्यात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तर अनेक योजनांचा पाऊस पाडला. त्यात 2047 पर्यंत विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे.
