
कोणी ब्लॅकमेल केलं तर ते सहन केलं जाणार नाही, दहशतवाद आणि त्यांना ताकद पुरवणाऱ्यांना आता आम्ही वेगळं मानणार नाही.भारताने ठरवलं आहे, आता रक्त आणि पाणी आता एकत्र वाहणार नाही, असं ठणकावून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला कठोर इशारा दिला आहे. संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरूनच कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांना आणि संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूच्या मुद्यावरून बोलतानाचा कोणतंही ब्लॅकमेलिंग सहन करणार नसल्याचा इशारा दिला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. पंतप्रधान मोदींच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की येत्या काळात सिंधू पाणी करार स्थगित राहणार आहे.
पंतप्रधान मोदींचे हे विधान पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण पाकिस्तानी पंतप्रधान आणि त्यांचे अनेक नेते सिंधू पाणी करार पुन्हा सुरू करण्याबद्दल बोलत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पष्ट केलं की, कोणत्याही परिस्थितीत रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.
पंतप्रधान काय म्हणाले ?
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सिंधू पाणी कराराबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ठरवले आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. सिंधू करार किती एकतर्फी आणि अन्याय्यकारक आहे, हे आता देशवासियांना कळलं आहे.हा करार योग्य नाही. सिंधूचं पाणी शत्रूच्या जमिनीला सिंचन करत आहे आणि माझ्या देशाची जमीन तहानलेली आहे. हा कोणत्या प्रकारचा करार होता? त्यामुळे अनेक वर्षांपासून देशाचे इतके नुकसान झाले आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा करार स्वीकारार्ह नाही असं मोदी म्हणाले.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says, “The people of our country have clearly understood how unjust and one-sided the Indus agreement is. The waters of rivers originating in India have been irrigating the fields of our enemies, while the farmers and the land of my… pic.twitter.com/N0hbEU1gmR
— ANI (@ANI) August 15, 2025
पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण भारत आणि तेथील शेतकऱ्यांचा सिंधू नदीच्या पाण्यावर अधिकार आहे. जी परिस्थिती सहन केली गेली आहे ती आता सहन करता येणार नाही. हा सिंधू करार मान्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
आजच्या भाषणातून त्यांनी सिंधू करारावरून भारतावला धमक्या देणआऱ्या पाकिस्तानाला स्पष्ट इशारा दिला आहे. सिंधू नदीचं पाणी रोखल्यास भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा अनेक धमक्या पाकिस्तानच्या नेत्यांनी दिल्या होत्या. त्याला पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं.