
भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. एका सरकारी जाहीरातीनुसार, भारताचा जीडीपी सध्या 4.18 ट्रिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचला आहे. अंदाज आहे की, 2030 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसारी मोठी आर्थिक महाशक्ती बनू शकतो. मजबूत देशांतर्गत मागणी आणि रचनात्मक सुधारणांच्या बळावर भारत जगातील वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे.आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी 8.2 टक्क्यापर्यंत वाढला. पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के आणि मागच्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 7.4 टक्के होता. मागच्या सहा तिमाहीतील हे वेगवान वाढ आहे.
जागतिक व्यापारात अनिश्चितता असताना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने प्रगती झाली आहे. मजबूत आर्थिक पायामुळे भारताचा जीडीपी 2030 पर्यंत 7.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल असा सरकारला विश्वास आहे. सध्या अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
G-20 देशांमध्ये भारतच सर्वात पुढे
आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुद्धा भारतातील विकासाच्या संभावनांबद्दल आशावाद व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने 2026 मध्ये भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवलाय. मूडीजनुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2026 मध्ये 6.4 टक्के आणि 2027 मध्ये 6.5 टक्क्याने वाढेल. G-20 देशांमध्ये भारतच सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहीलं.
IMF चा अंदाज काय?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था IMF ने 2025 साठी विकास दर वाढवून 6.6 टक्के आणि 2026 साठी 6.2 टक्के केला आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD) ने 2025 मध्ये 6.7 टक्के आणि 2026 मध्ये 6.2 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला आहे. एसएंडपीने चालू वित्त वर्षात 6.5 टक्के आणि पुढच्या वित्त वर्षात 6.7 टक्के वाढीची शक्यता वर्तवली आहे.
इतकी आर्थिक गती कशी?
आशियाई विकास बँकेने (ADB) 2025 साठी आपला अंदाज वाढवून 7.2 टक्के केला. फिचने मजबूत ग्राहकांचा हवाला देत वित्त वर्ष 2026 मध्ये 7.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. महागाई दर सहनशील सीमेच्या खाली आहे. बेरोजगारी दरात घसरणीचा कल आणि निर्यातीत सतत होणारी सुधारणा. आर्थिक स्थिती स्थिर आहे. शहरात विक्रीमध्ये होणारी वाढ. त्यामुळे आर्थिक गतीला आधार मिळालाय.