AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fourth Largest Economy: नवीन वर्षापूर्वी मोठी खुशखबर! भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

India become World Fourth Largest Economy: सरत्या वर्षात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीयांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Fourth Largest Economy: नवीन वर्षापूर्वी मोठी खुशखबर! भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
| Updated on: Dec 30, 2025 | 4:35 PM
Share

India become World Fourth Largest Economy: भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठी बातमी समोर आली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हाती आलेल्या वृत्तानुसार, भारत, जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकवल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, भारताचे एकूण सकल घरगुती उत्पादन (GDP) 4.18 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचले आहे. अर्थात याची अधिकृत माहिती 2026 मध्ये जाहीर होणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार, 2026 मध्ये भारताचा GDP 4.51 ट्रिलियन डॉलर असू शकतो. तर जपानचा जीडीपी 4.46 ट्रिलियन डॉलर असेल. म्हणजे भारत जपानला मागे टाकणार हे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

भारताची तिसऱ्या क्रमांकाकडे मोठी घोडदौड

पण सरकारचा दावा चौथ्या क्रमांकाचा नाही, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार असल्याचा आहे. आर्थिक समिक्षेनुसार, जर भारतीय अर्थव्यवस्था अशीच घोडदौड करत असले तर भारत येत्या अडीच ते तीन वर्षांत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारताची GDP 7.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचू शकते. जागतिक अस्थिरता आणि व्यापार, व्यावसायिक दबावापुढे न झुकता भारतीय अर्थव्यवस्था जोरदार आर्थिक आघाडीवर सरस कामगिरी करेल. लवकरच मोठा आर्थिक चमत्कार घडेल.

पण सर्वसामान्य भारतीयांचं उत्पन्न कमी

पण या प्रगतीचे दुसरे चित्रही समोर आले आहे. एकूण GDP मध्ये भारताने मोठी झेप घेतली असली तरी सर्वसामान्य भारतीयांच्या उत्पन्नात मात्र घसरण होत आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार,2024 मध्ये भारताच्या प्रत्येक व्यक्तिचे उत्पन्न केवळ 2,694 डॉलर होते. तर जपानमधील सामान्य नागरिकाचे उत्पन्न आपल्यापेक्षा 12 पट आणि जर्मनीपेक्षा जवळपास 20 पट अधिक आहे. भारत 2023 मध्ये चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. यातील जवळपास 1.4 अब्ज लोकसंख्या ही 10 ते 26 वर्ष वयोगटातील आहे. भारत सर्वात तरुण देश ठरला आहे. पण रोजगार निर्मिती, नवीन नोकऱ्या आणि सर्वसामान्यांच्या हाती अधिक पैसा या सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

आर्थिक मोर्चावर कोणताच्या दबावाला बळी नाही

भारताची अडवणूक करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून अनेक अडथळे आणि कुरापती केल्या. भारतावर टॅरिफ लावला. इतर देशांवर दबाव टाकून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम भारतीय रुपयावर स्पष्ट दिसून येत आहे. रुपयाचे सर्वात मोठे अवमूल्यन होत आहे. पण आर्थिक मोर्चाच्या वेगावर, गतीवर त्याचा कोणताही परिणाम झाले नसल्याचे दिसून आले आहे. भारत आर्थिक मोर्चावर आता चौथ्या स्थानावर आला आहे. हा ट्रॅम्प यांच्यासाठी निश्चितच धक्का मानल्या जात आहे.

मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.