KDMC Election : कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच भाजपचा मोठा विजय, नगरसेविकेची पहिली प्रतिक्रिया
KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेत भारतीय जनता पक्षाने विजयाचं खातं काल उघडलं आहे. पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत... त्यामुळे पक्षात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.

KDMC Election : महापालिकांच्या निवडणुकीत कोणता पक्ष मोठा ठरेल अशा चर्चा सुरु असताना भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 ला मतमोजणी होऊन विजयी उमेदवार जाहिर होणार आहेत. पण त्याआधील भाजपच्या विजया नारळ फुटला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भारतीय जनता पक्षाने विजयाचं खातं काल उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 26 क मधून भारतीय जनता पक्षाच्या आसावारी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय झाला आहे. मतदानाच्या आधीत विजयी घोषित झाल्यानंतर रेखा चौधरी यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.
बिनविरोध निवडून आल्यानंतर रेखा चौधरी आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ‘हा हिंदुत्वाचा विजय आहे. मला मीडियाच्या माध्यमातून बातमी मिळाली की माझा बिनविरोध विजय झाला आहे, प्रभागामध्ये काम करत असताना एक आनंद असतो आणि आणि फिरत असताना नागरिक म्हणत होते की, वहिनी तुम्हीच… पण आज खरंच नागरिकांचा माझ्यावर जो विश्वास होता तो आता सत्यात उतरला आहे… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि अन्य पदाधिकाऱ्यांना रेखा चैधरी यांना विजय समर्पित केला… सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
‘हा महायुतीची विजय आहे आणि पुढे देखील मी महायुतीसाठी काम करत राहिल… ‘ असं देखील रेखा चौधरी म्हणाल्या… … सांगायचं झालं तर,उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा (मंगळवार) शेवटचा दिवस होता. तर उमेदवारी न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. पण भाजप पक्षाने मतदानाआधी कल्याण – डोबिंवलीत स्वतःचं खातं उघडलं आहे…
कल्याण – डोंबिवली मतदार संघाबद्दल सांगायचं झालं तर, निवडणुकीत कल्याण डोंबिवली ही महापालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या महापालिकेत एकूण 122 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. चार सदस्यीय हा प्रभाग असून एकूण 31 प्रभागातून 122 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहेत. तर आता दोन नगरसेवक तर भाजपचे निवडून आले आहेत. आसावारी नवरे आणि रेखा राजन चौधरी यांच्यानंतर कल्याण – डोबिंवलीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
