इंडिया एआय इम्पॅक्ट समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल – राष्ट्रपती
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात येणार आहे. यावर बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की, 'हे समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.'

राजधानी नवी दिल्लीत 5 दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले जाणार आहे. यामध्ये समान वाढ, सामाजिक कल्याण आणि ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) सोबत आयोजित या जागतिक परिषदेचा उद्देश ‘एआय फॉर गुड’ ॲप्लिकेशन्स आणि नैतिक, स्वदेशी नवोपक्रम प्रदर्शित करणे हा आहे. हे समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असं विधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे दिल्लीत आयोजन
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट बाबत बोलत आहे. यात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत सरकारकडून एआय रिसर्चचा प्रसार करण्यासाठी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट आयोजित करण्यात आले आहे. हे समिट नवी दिल्लीत आयोजित करण्यात येत असून यात जगभरातील 100 च्या आसपास देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
हा कार्यक्रम तळागाळातील लोकांसाठी फायदेशीर ठरेल
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, या कार्यक्रमाचा उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ एक तांत्रिक साधन न राहता, सर्वसमावेशक वाढीसाठी एक धोरणात्मक साधन बनेल आणि लोकसंख्येच्या शेवटच्या घटकासाठी ऐतिहासिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असलेल्या संधींपर्यंत पोहोच वाढवेल. मला विश्वास आहे की, हा कार्यक्रम लोकांच्या फायद्यासाठी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लाभ उठवण्यात मोठी भूमिका बजावेल.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ची माहिती
ही परिषद ग्लोबल साउथमध्ये पहिली जागतिक एआय परिषद म्हणून ओळखली जाते, ज्यात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सहभागाची पुष्टी केली आहे. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच एआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन धोरणात्मक सहकार्यावर चर्चा केली, आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान व एआय कौशल्य विकासावर भर दिला. या परिषदेत एक संशोधन परिसंवाद, YUVAi ग्लोबल यूथ चॅलेंज आणि जबाबदार एआय प्रशासनावरील चर्चा यांचा समावेश आहे.