पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, मोठा हादरला, थेट..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले. ज्यानंतर पाकिस्तानचा मोठा थयथयाट बघायला मिळत आहे. पाकिस्तानला पळता भुई कमी भारताने केली. त्यातच आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली.

पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, मोठा हादरला, थेट..
Indus Water Treaty
| Updated on: Sep 25, 2026 | 9:46 AM

भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल कोणतीही तडजोड करत नाही. त्यातच पहलगाममध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे उद्धवस्थ केली. हेच नाही तर भारत यावरच थांबला नाही तर भारताने पाकिस्तानचे पाणीही बंद केले. भारताने थेट सिंधू जल करार स्थगित केला. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये पार वाट लागली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्ताने थेट जागतिक कोर्टात धाव घेतली. पण भारताने यालाही दाद दिली नाही. आम्हाला हा निर्णय मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. भारतावर सिंधू जल करारावरील बंदी उठवण्यासाठी पाकिस्तान दबाब आणण्याचे काम करत आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DefCon 2026 कार्यक्रमात बोलताना भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची आणि आत्मनिर्भरतेची मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. राजनाथ सिंह यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा एकमेकांवर अवलंबून आहेत. भारत हा जगातील अव्वल 5 अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

भारत लोकशाही आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतो. पण ज्यावेळी भारताच्या सुरक्षेचा प्रश्न येतो त्यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे भारत कठोर अशी पाऊले उचलतो. हेच नाही तर राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाह. याकरिता भारताने सिंधू जल करार स्थगित केला.

भारताने 1998 च्या अणू चाचणीव्दारे स्पष्ट केले की, भारत कोणत्याही ण्वस्त्र ब्लॅकमेलिंगला किंवा चिथावणीखोर विधानांना बळी पडत नाही. यादरम्यानच राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, आम्ही युद्धाच्या बाजूने नाही, भापत हा शांतताप्रिय देश आहे. पण भयापोटी मिळालेली शांतता निंदनीय असते. शांततेसाठी लढले गेलेल युद्ध आवश्यक आहे. आम्ही आमच्या सैन्याला पूर्णपणे स्वातंत्र दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us