100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती, भारतात हाहाकार, हवामान शास्त्रज्ञांची भीतीदायक भविष्यवाणी..
अल निनोबद्दल शास्त्रज्ञांकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. अल निनोचे संकट उभे आहेत. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होत आहे. 2024 पेक्षाही स्थिती अधिक भीषण आणि वाईट असणार आहे.

अल निनोबद्दल दिलेल्या इशाऱ्याने मोठे टेन्शन वाढले. हवामान शास्त्रज्ञांनी एल निनो कहर करणार असल्याचे स्पष्ट केले. याचा सर्वात जास्त आणि मोठा धोका भारताला आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने हा इशारा दिला. 2027 मध्ये अल निनोमुळे 2024 सारखी वाट लागू शकते. गर्मीच्या प्रकरणात 2024 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अल निनोमुळेचा मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होईल. ज्यामुळे भारतातील पिकांवर गंभीर परिणाम होईल. तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, तापमान सामान्याहून 3 डिग्रीपर्यंत जाईल. मागच्या 100 वर्षात लोकांनी अल निनोचा जसा प्रभाव बघितला नाही, तसा प्रभाव बघायला मिळेल. प्रशांत महासागरात तापमान वाढताना दिसेल. अल निनोबद्दल अनेक अंदाज वर्तवली जात आहेत. भयंकर संकट अल निनोच्या माध्यमातून जगापुढे उभे आहे.
2024 मध्ये प्रचंड गर्मी पडली होती, वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, 2027 मध्ये त्यापेक्षाही धक्कादायक स्थिती असेल. अल निनो 9 महिने ते एक वर्ष राहू शकतो. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. अल निनोचा परिणाम मॉन्सूनवर बघायला मिळतोय. सामान्यपणे 90 टक्के पाऊस होतो. मात्र, मागच्या 11 वर्षांचा विचार करता, यंदा पाऊस कमी आहे.
आयएमडीच्या हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, 2027 मध्ये 2024 पेक्षा गर्मी अधिक असेल. अल निनोमुळे अनेक मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे महागाईमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जगाची झोप उडवणारा इशारा अल निनोबाबत देण्यात आला. मॉन्सूनचा पाऊस म्हणावा तसा कोसळताना दिसत नाहीये.
अल निनोमुळे शेतीवर थेट परिणाम होत आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस कोसळताना दिसत नाहीये. त्यातच आता हा मोठा इशारा देण्यात आला. फक्त भारतावरच नाही तर या अल निनोचा जगावर परिणाम होईल. जून महिन्यात अपेक्षित पाऊस देशात झाला नाही. पण जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही तसा समाधानकारक पाऊस कोसळताना दिसत नाहीये. त्यातच आता हा झोप उडवणारा इशारा हा देण्यात आला.