AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासंदर्भात देखील मोठी बातमी समोर आली आहे.

IMD weather update : आभाळ फाटणार, थेट 17 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?
IMD weather updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 5:06 PM
Share

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सूनवर अल् निनोचं संकट असेल असा इशारा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये अल् निनोचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसून आलं, देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान आता तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांना हाय अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा अशा 17 रांज्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये वादळी वाऱ्याची देखील शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची तूट झाली आहे, सोलापूर जिल्ह्यात तब्बल 33 टक्के इतकी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने, पावसाची तूट निर्माण झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच असून, पुढील दोन महिने महाराष्ट्रात सरासरी पावसाची अपेक्षा आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस.डी सानप यांनी वर्तवला आहे.  यंदा राज्यात पावसाचं प्रमाणा हे असमान राहिलं आहे, काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत