AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालबागच्या राजाला त्यावेळी फुटाणे द्यायलाही कुणी नसायचे, अभिनेत्रीने थेट सांगितलं सर्व..

Savita Malpekar On Lalbaugcha Raja Mumbaicha Raja: लालबागच्या राजाबद्दल लोकांमध्ये प्रचंड मोठी क्रेझ बघायला मिळते. लोक हजारो किलो मीटरचे अंतर पार करून राजाच्या दर्शनाला येतात. त्यातच आता एका अभिनेत्री लालबागच्या राजाबद्दल अत्यंत मोठे विधान केले.

लालबागच्या राजाला त्यावेळी फुटाणे द्यायलाही कुणी नसायचे, अभिनेत्रीने थेट सांगितलं सर्व..
Lalbaugcha Raja Savita Malpekar
| Updated on: Sep 25, 2026 | 5:55 PM
Share

काकस्पर्श सारख्या चित्रपटात धमाकेदार भूमिका साकारणारी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी नुकताच लालबागच्या राजाबद्दल मोठे विधान केले. सविता मालपेकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिली. गाढवाचं लग्न नाटकातील त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. सविता मालपेकर यांनी नुकताच तारांगणला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे आजोळ लालबाग काळाचाैकी असल्याचे सांगितले जाते. आईसोबत इथल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी न चुकता यायचे. त्यांनी पुढे म्हटले की, तेव्हा लालबाग राजाच्या इथे फुटाणे द्यायलाही कुणीच नसायच. मराठी अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या की, काळाचाैकीला सिताबाईची चाळ होती. त्याठिकाणी माझे मामा राहायचे.

ते माझे आजोळ होते. आजोबांची सोन्या चांदीची पेठी होती. लहानपणी आमची आई आम्हाला तिथे घेऊन यायची. तेव्हा इथेच रोज या रस्त्यावर आम्ही फिरायचो. इथे चोरगल्ली आहे. त्या चोरगल्लीतून आम्ही येत. आता तिथे लालबागचा मोठा राजा आहे… नमस्कार करायचा तिथे फुटाणे द्यायलाही कोणी नसायचे. गणेशगल्लीत मात्र, खूप जास्त गर्दी असायची.

इथे आता जी गर्दी दिसते ती नाही. उंच गणपती, देखावा, उंच उंच गणपती असायचे. अभिनेत्रीने आपल्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री नक्की लहाणपणी लालबागमध्ये नक्की काय होते. वातावरण कसे होते हे सांगितले. मात्र, आता बदललेल्या गोष्टींवर बोलताना अभिनेत्री दिसली. लालबागच्या राजाच्या ठिकाणी नक्की काय होते, हे सांगताना अभिनेत्री दिसली आहे.

लालबागच्या राजाची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. लोक 24 तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. मोठी गर्दी असते. लोक लांबून लांबून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. लहान लहान मुलांना घेऊन लोक कित्येक तास रांगेत बसतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. लोक वेगवेगळे नवस लालबागच्या राजापुढे बोलतात आणि नवस पूर्ण झाली की, राजाच्या दर्शनासाठी येतात.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत