ज्ञानेश कुमार यांना विजेच्या खांबावर…, खासदाराची भयंकर मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रान पेटलं आहे. त्यांना पदवरून हटवण्याची मागणी केली जात आहे. तर काही जण त्यांच्या अटकेची मागणी करत आहे. आता खासदार पप्पू यादव यांनी भयंकर मागणी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षाचे नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. तर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी भयंकर मागणी केली आहे. पप्पू यादव यांनी थेट ज्ञानेश कुमार यांना फाशीची मागणी केली आहे. त्यांना विजेच्या खांबावर लटकवण्याची मागणी केलीय. गरीब, दलित, कमकुवत, वंचित वर्गातील लोकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, असं म्हणत पप्पू यादव यांनी ज्ञानेश कुमार यांची तुलना थेट दहशवाद्यांशी केली
पप्पू यादव यांनी म्हटलं की, ज्ञानेश कुमार यांना फाशीची शिक्षा व्हावी. गोरगरीब, वंचित समाजातील लोकांचे अधिकार आणि मतचोरीच्या विरोधात कडक संदेश जाण्यासाठी कठोर शिक्षा द्यावी. संविधानाचा गळा दाबणे आणि लोकशाहीची हत्या करण्याचे कृत्य ज्ञानेश कुमार यांनी केलं. त्यांचं कृत्य दहशवाद्यापेक्षा कमी नाही’. पप्पू यादव यांनी पुढे आरोप केला की, ज्ञानेश कुमार यांना RSS, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी पाठिंबा दिलाय. या व्यतिरिक्त मदत करणारे अनेक मंत्री आहेत. त्यांना तातडीनं हटवण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षाने एकत्र यायला हवं’.
काय आहे प्रकरण ?
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षातील सर्व पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे. एका अहवालानुसार, निवडणूक आयोगाचं हे तीन सदस्यीय आहे. ज्ञानेश कुमार यांच्यासहित तीन जण आयोगात आहे. या आयोगातील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप ज्ञानेश कुमार यांच्यावर आहे. निवडणूक आयोग घटनात्मक संस्था असून यात बहुमताने निर्णय घेण्याची तरतूद आहे. परंतु मागील 10 महिन्यात दोन्ही आयुक्तांनी 14 वेळा आक्षेप घेतले. परंतु त्यांच्या तक्रारीकडे ज्ञानेश कुमार यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. दोन्ही आयुक्तांनी एसआयआर पद्धतीवरही आक्षेप घेतला होता. त्यांनी या पद्धतीवर वारंवार आक्षेप घेऊन ज्ञानेश कुमार यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. आयुक्त सुखबीर सिंग संधू यांनी फॉर्म 6 मध्ये केलेल्या दुरुस्त्यांवर सवाल केले. त्याला अनधिकृत असल्याचे म्हटलं. त्यांनी 60 दिवसांत आठ वेळा उपस्थित केला. परंतु त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. दोघांच्या आरोपाने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
