
First Hydrogen Train Tria: भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज महत्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी आजपासून सुरु होत आहे. पर्यावरणपूरक असलेली ही ट्रेन चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत (ICF) तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या 89 किलोमीटर मार्गावरील चाचणी ३१ मार्चपासून सुरु होत आहे. यशस्वी चाचणीनंतर ट्रेन नियमित कार्यान्वित करण्याची योजना आहे. भारतीय रेल्वेच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या विशेष प्रकल्पांतर्गत हरित वाहतुकीच्या दिशेने ही ट्रेन एक मोठे पाऊल आहे. या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत पाहू या…
हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे. ही ट्रेन पारंपारिक डिझेल गाड्यांना इको-फ्रेंडली पर्याय आहे. हायड्रोजन वायूचा वापर या ट्रेनमध्ये इंधन म्हणून करण्यात आला आहे. हायड्रोजन गॅस ऑक्सिजनसोबत मिळून वीज निर्माण करते. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते. या वीजने ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवली जाते. हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम मानल्या जातात.
‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.