AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Nidhi Tewari: कोण आहे IFS निधी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवले खासगी सचिव

PM Modi Private Secretary: निधी तिवारी यांचे खासगी सचिव म्हणून काम खूप महत्त्वाचे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांचे समन्वय करणे, बैठका आयोजित करणे आणि सरकारी विभागांशी संपर्क साधण्याचे काम त्या पाहतील.

Who is Nidhi Tewari: कोण आहे IFS निधी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवले खासगी सचिव
निधी तिवारीImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 01, 2025 | 10:12 AM
Share

PM Modi Private Secretary: भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. निधी तिवारी 2014 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. सध्या पंतप्रधान कार्यालयातच त्या उपसचिव आहेत. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निधी तिवारी यांची पंतप्रधानांचे वैयक्तीक सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू आहे. आदेशानुसार, निधी तिवारीचा पगार पे मॅट्रिक्स लेव्हल 12 नुसार निश्चित केला जाईल.

कोण आहे निधी तिवारी

निधी तिवारी 6 जानेवारी 2023 पासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत आहे. निधी तिवारी यांनी 2013 मध्ये नागरी सेवा परीक्षेत 96 वा क्रमांक मिळविला होता. त्या वाराणसीमधील महमूरगंज येथील रहिवासी आहेत. वाराणसी 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. 2013 मध्ये यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी निधी तिवारी वाराणसीत सहायक आयुक्त होत्या. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पंतप्रधान कार्यालयात आतापर्यंत त्या परराष्ट्र व सुरक्षा विभागात उपसचिव होत्या. त्या सरळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना रिपोर्ट करत होत्या.

काय असणार जबाबदारी

निधी तिवारी यांचे खासगी सचिव म्हणून काम खूप महत्त्वाचे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांचे समन्वय करणे, बैठका आयोजित करणे आणि सरकारी विभागांशी संपर्क साधण्याचे काम त्या पाहतील. यापूर्वीही अनेक महिला अधिकाऱ्यांना पीएमओमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

पीएमओ आणि विविध मंत्रालये, विभाग आणि इतर विभाग यांच्यातील समन्वयाचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून निधी तिवारी यांच्यावर जबाबदारी असेल. धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. निधी तिवारी यांना पंतप्रधानांच्या खाजगी सचिवपदी बढती दिल्याने महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला गेला आहे. याशिवाय त्या पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून त्या आल्या आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.