मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी भारत स्वदेशी ट्रेन बनवतोय, काय असणार वैशिष्ट्ये ?

भारताच्या महत्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता जपानच्या ऐवजी देशी बनावटीचे डबे तयार केले जात आहेत. हे डबे आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांनुसार तयार करण्यात येत आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी भारत स्वदेशी ट्रेन बनवतोय, काय असणार वैशिष्ट्ये ?
BULLET TRAIN MAKE IN INDIA COACH
| Updated on: Nov 01, 2026 | 6:46 PM

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. एकूण 508 किमीच्या या हायस्पीड मार्गाचा पहिला टप्पा साल 2027 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारत स्वत: च ट्रेन बनवत आहे. भारतात बनवलेल्या ‘बुलेट ट्रेन’च्या माध्यमातून भारत स्वदेशी हाय-स्पीड रेल तंत्रज्ञानाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठीची ही ट्रेन कर्नाटकातील बंगळुरू येथे असलेल्या बीईएमएल (BEML) प्रकल्पात तयार केली जात आहे.
ही ट्रेन म्हणजे प्रगत अभियांत्रिकी आणि स्वदेशी कौशल्य यांचा मेळ असून प्रवाशांच्या सोयी आणि सुविधा तसेच सुरक्षितता धान्यात घेऊन भारतीय परिस्थितीनुसार ही ट्रेन डिझाईन केली जात आहे.

कशी असणार ही ट्रेन –

या ट्रेनची कमाल टेस्ट स्पीड जरी दर ताशी 280 किमी असला तर ऑपरेशनल स्पीड हा दर ताशी 249 किमी असणार आहे.

Loading...

या ट्रेनची एकूण लांबी 202 मीटर असणार आहे. या ट्रेनला 8 डब्बे असणार असून त्यातील चार डबे मोटर कार आणि 4 ट्रेलर कार असणार आहेत.

या ट्रेनची प्रवासी क्षमता 557 प्रवाशांची असणार आहे. त्यात 2 आसने दिव्यांगजनासाठी आरक्षित असणार आहेत.

या ट्रेनला स्टँडर्ड दर्जाचे 7 डबे हे 3×2 सिटींग सिस्टीमचे असणार आहेत. आणि एक एक्झुकेटिव्ह क्लास कार डबा 2×2 सिस्टीमचा असणार आहे.

या ट्रेनला दोन्ही बाजूंना ड्रायव्हर कॅब असणार आहे. दोन आठ डब्याच्या ट्रेन भविष्यात एकत्र जोडून 16 डब्याची ट्रेन करण्याची योजना आहे.

BULLET TRAIN NEWS

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कर्नाटकातील बंगलुरु येथे बीईएमएल (BEML) च्या कारखान्याला भेट देऊन बुलेट ट्रेनच्या डब्याच्या कामाची पाहणी केली आहे. त्याचे हे छायाचित्र आहे.

 

ट्रेनची वैशिष्ट्ये नेमकी  काय ?

या आसनांना पुरेशी लेगरूम असणार आहे. तसेच ही आसने अर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेली असतील.

दिव्यांगजनाना खास सोयीची आसने तयार करण्यात आली आहेत.

एलईडी इंटेरियर लायटिंग असणार आहे.

ओव्हरहेड बॅगेज लगेज असणार आहे.

अतिरिक्त फ्लोअर माऊंटेड लगेज स्टँड मोठ्या लगेजसाठी असणार

लॅपटॉप आणि मोबाईल डिव्हाईससाठी अतिरिक्त पॉवर लेट्स

आधुनिक बायोडायजेस्टर टॉयलेट

प्रत्येक सिटच्या रांगेसाठी रुंद खिडकी

डब्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी सिंगल पीस गँगवे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us