उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..
राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले. तूफान पाऊस उत्तर प्रदेशमध्ये असून भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला.

राज्यात पावसाने पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाची घोषणा केली. राज्यात स्थिती भीषण आहे. पाऊस नसल्याने पिके हातून गेली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला. उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 15 जणांचा जीव गेला. असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 117 कच्ची घरे कोसळली आहेत. राज्यातील 63 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कित्येक पटीने जास्त पावसाची नोंद झाली आहे. राजधानी लखनऊसह कानपूर, फरुखाबाद आणि पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांत जलमय परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते व शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. हवामान खात्याने 27 सप्टेंबर रोजीही अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे 48 तासांत 15 जणांचा जीव गेला असून 117 घरे बाधित झाली आहेत. लखीमपूर खेरीमध्ये सर्वाधिक 4 तर अयोध्या, अमेठी, बहराइच आणि कानपूरसह इतर जिल्ह्यांत प्रत्येकी 1 जणाचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा प्रचंड जास्त पाऊस नोंदवला गेला असून कानपूर आणि फरुखाबादमध्ये पावसाने सर्व विक्रम मोडले आहेत.
पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली असून राजधानी लखनऊसह सखल भाग आणि महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवत 8 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट’तर 13 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातला. लोकांचे जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले.
अमरावती जिल्ह्यातील 14 ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिली आहेत. अमरावती जिल्ह्यात त्रीस्तरीय समिती करणार पंचनामे. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा समावेश असून ते गाव पातळीवर करणार पंचनामे करत आहेत. यामध्ये प्रत्येक गावातील पाच प्लॉटमधील नुकसान मोजण्यात येऊन त्याची सरासरी काढण्यात येईल व नुकसानीचे प्रमाण ठरवण्यात येणार आहे.