पाकिस्तानला सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं, सौदीने भारताची फक्त ही ऑफर स्वीकारावी

आता भारताने पाकिस्तानला वेगळं पाडण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. सौदी अरेबियाला मोठी ऑफर दिली आहे. भारताची ही ऑफर सौदीने स्वीकारली, तर पाकिस्तानचा जळफळाट होईलच, सोबतच त्यांच्यासाठी तो मोठा झटका असेल.

पाकिस्तानला सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं, सौदीने भारताची फक्त ही ऑफर स्वीकारावी
Indian Army
| Updated on: Aug 29, 2025 | 3:19 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली. जगभरात पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला. आता भारताने पाकिस्तानला वेगळं पाडण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. सौदी अरेबियाला मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर भारत-सौदी अरेबिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या सातव्या बैठकीत देण्यात आली आहे. 28 ऑगस्टला दिल्लीत ही बैठक झाली.

भारतीय संरक्षण मंत्रालयानुसार, या बैठकीला सहअध्यक्ष संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि सौदीकडून स्टाफ मेजर जनरल साद मोहम्मद एच अलकाथिरी उपस्थित होते. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक भक्कम करायची अशी कटिबद्धता व्यक्त केली. मागच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीत जे निर्णय झाले, त्याची अमलबजावणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

भारताने काय ऑफर दिली?

सौदी अरेबियासोबत संरक्षण संबंध अजून मजबूत करणं आणि सहकार्याची नवीन क्षेत्र शोधण्यासाठी दोन्ही देशांनी ट्रेनिंग सहकार्य औद्योगिक भागीदारी, समुद्री सहकार्य आणि सैन्य अभ्यास या मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी आपली ट्रेनिंग क्षमता आणि सहकार्यावर चर्चा केली. भारताने सौदीच्या सैन्याला ट्रेनिंगची ऑफर दिली आहे. सायबर, आयटी, डिजास्टर मॅनेजमेंट आणि सामरिक संचार सहकार्यावर चर्चा केली.

पाकिस्तानला झटका कसा बसेल?

सौदी अरेबियाच्या सैन्य पथकांना पाकिस्तानी सैन्य ट्रेनिंग देतं. पाकिस्तानी सैन्याने सौदी अरेबियासोबत अनेक जॉइंट ट्रेनिंग एक्सरसाइज केल्या आहेत. पाकिस्तानात दोन्ही देशांनी संयुक्त युद्ध सराव आणि प्रशिक्षण दिलय. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मजबूत सैन्य संबंध आहेत. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया मिळून हवाई, जमीन आणि समुद्रात युद्धसराव करतात.

भारताचं धोरण काय?

पाकिस्तानी आणि सौदी अरेबियामध्ये घनिष्ठ संबंध आहेत. आतापर्यंत पाकिस्तान सौदीच्या सैन्याला प्रशिक्षित करत होता. आता भारताने सौदी अरेबियाला ट्रेनिंगची ऑफर दिली आहे. उद्या सौदीने ही ऑफर स्वीकारल्यास पाकिस्तानसाठी मोठा झटका असेल. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आखाती देशांसोबत घनिष्ठ संबंध विकसित करण्यावर त्यांचा भर आहे.