मोठी बातमी! जहाजावर हल्ला होताच भारत आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, सर्वात मोठी कारवाई, आता थेट अमेरिकेविरोधात…

बुधवारी स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात भारतीय नाविक असलेल्या एका जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर आता भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहाया मिळत असून, मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी! जहाजावर हल्ला होताच भारत आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, सर्वात मोठी कारवाई, आता थेट अमेरिकेविरोधात...
attack on an Indian ship
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 11, 2026 | 7:21 PM

बुधवारी 10 जून रोजी स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एका व्यापारी जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला होता. या ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते. हल्ल्यानंतर त्यातील 21 क्रू मेंबरला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही 3 क्रू मेंबर बेपत्ता आहेत. या हल्ल्यानंतर आता भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर जाहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने अमेरिकन दुतावासाला एक विरोध पत्र देखील लिहिण्यात आलं आहे, भारताच्या वतीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे, भारताने व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना आपली नाराजी कळवली आहे. बुधवारी ओमानच्या किनाऱ्यावर ‘सेटेबोलो’ नावाच्या जहाजावर भीषण हल्ला झाला होता.

ज्या जहाजावर हल्ला झाला, त्या जहाजावर 24 भारतीय क्रू मेंबर होते, त्यातील 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर तीन जण अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये तणाव कमी झाला पाहिजे, तसेच व्यापारी जहाजांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे, अशा जहाजांना विना अडथळा वाहतूक करता आली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी भारताने केली आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रायलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, सध्या भारताचा दुतावास तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अद्यापही जिथे हा हल्ला झाला तिथे ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही तणाव कायम आहे, या तणावामुळे निर्माण झालेल्या संघर्षाचा हा परिणाम आहे. त्यामुळे आम्ही आता हा तणाव कमी करून चर्चे द्वारे हा प्रश्न सोडवला जावा अशी मागणी करतो, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुज वाहतुकीसाठी बंद असल्याने त्याचा मोठा फटका हा अनेक देशांना बसत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us