भारतीय सैन्य अधिकाऱ्याची कमाल, जगातील पहिलं युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं, वैशिष्ट्य काय?

| Updated on: Jan 14, 2021 | 1:12 AM

एका भारतीय सैन्य अधिकाऱ्याने जगातील पहिलं स्वदेशी युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं आहे. ही कमाल करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याचं नाव मेजर अनूप मिश्रा असं आहे.

भारतीय सैन्य अधिकाऱ्याची कमाल, जगातील पहिलं युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं, वैशिष्ट्य काय?
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेंमध्ये जवानांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. याचाच विचार करुन एका भारतीय सैन्य अधिकाऱ्याने जगातील पहिलं स्वदेशी युनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं आहे. ही कमाल करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याचं नाव मेजर अनूप मिश्रा असं आहे. या बुलेटप्रूफ जॅकेटला ‘शक्ती’ असं नाव देण्यात आलंय. या जॅकेटची खासियत म्हणजे पुरुष आणि महिला दोघांनी ते घालता येणार आहे. याशिवाय हे जॅकेट जगातील सर्वात लवचिक बॉडी कवच आहे. भारतीय सैन्यासाठी हे जॅकेट गेम चेंजर ठरणार आहे (Indian Army Major Anoop Mishra developed worlds first universal bulletproof jacket).

मेजर अनूप मिश्रा यांनी अशाप्रकारे काही नवा शोध लावण्याची ही काही तशी पहिलीच वेळही नाही. यूनिव्हर्सल बुलेटप्रूफ जॅकेट ‘शक्ती’ तयार करण्याआधी त्यांनी स्वदेशी बुलेटप्रूफ हेल्मेटही तयार केलं होतं. 7 फेब्रुवारी 2020 रोजी डिफेन्स एक्सपो 2020 मध्ये त्यांचं बुलेट प्रूफ जॅकेट लाँच करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांनी याची चांगलीच दखल घेतली होती. हे बुलेटप्रूफ हेल्मेट 10 मीटरवरुन झाडलेली एके-47 ची गोळी देखील अगदी सहजपणे रोखते आणि सैनिकांचा जीव वाचवते. हे हेल्मेट ‘अभेद प्रोजेक्ट’ अंतर्गत तयार करण्यात आलं होतं.

फूल बॉडी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेटही तयार

मेजर मिश्रा यांनी फूल बॉडी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेटही तयार केलंय. जॅकेट स्नायपरची गोळी रोखण्यासही सक्षम आहे. या जॅकेटचं नाव ‘सर्वत्र’ असं ठेवण्यात आलंय. मिश्रा यांनच्या या जॅकेटमुळे सीमेवर होणाऱ्या हल्ल्यांपासून सैनिकांचं संरक्षण होणार आहे. यामुळे भारतीय सैन्याचा मोठा फायदा होणार आहे.

मिश्रा यांना जम्मू-काश्मीरमध्ये एका मोहिमेत गोळी लागली अन…

मेजर अनूप मिश्रा यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असताना एका मोहिमेवर असताना गोळी लागली होती. त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. विशेष म्हणजे त्या मोहिमेत त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेटही घातलेलं होतं. त्यामुळे गोळीने त्यांच्या शरीराला छेद दिला नाही. मात्र यात ते जखमी झाले. यानंतर त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्याचा विचार केला. अनूप मिश्रा भारतीय सैन्याच्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंगसाठी काम करतात.

हेही वाचा :

बक्षिसाचे 20 लाख हडप करण्यासाठी कट, जम्मू-काश्मीरमधील बनावट चकमकप्रकरणी मोठा खुलासा

सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही अधिक जवानांचा जीव घेणारं ‘हे’ कारण, अहवालात खुलासा

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

Indian Army Major Anoop Mishra developed worlds first universal bulletproof jacket