सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही अधिक जवानांचा जीव घेणारं ‘हे’ कारण, अहवालात खुलासा

सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही अधिक जवानांचा जीव घेणारं 'हे' कारण, अहवालात खुलासा

दरवर्षी सीमेवर शत्रुंचा हल्ला झाला नाही तरी किमान 100 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 09, 2021 | 4:05 PM

नवी दिल्ली : दरवर्षी सीमेवर शत्रुंचा हल्ला झाला नाही तरी किमान 100 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. थिंक टँक युनायटेड सर्विस इंस्टिट्यूशन ऑफ इंडियाने ( यूएसआय) प्रकाशित केलेल्या भारतीय सैन्याविषयीच्या अहवालात हे सांगण्यात आलंय. या अहवालानंतर अनेक स्तरावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यूएसआयच्या अहवालात सांगण्यात आलं आहे, “भारतीय सैन्यातील जितके जवान शत्रूसोबत लढताना शहीद होत नाहीत, त्यापेक्षा अधिक जवान आत्‍महत्‍या आणि मानसिक तणावामुळे आपला जीव गमावत आहेत (These are the important reasons forcing Indian Army soldiers to commit suicide every year).

भारतीय सैन्यातील जवानांच्या स्थितीवर प्रकाश टाकणारा हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण एकिकडे देशाचं संरक्षण करण्यासाठी हे जवान रात्रंदिवस शत्रूवर नजर ठेऊन असतात. मात्र, दुसरीकडे याच जवानांवर कामाचा प्रचंड बोजा असल्याचंही समोर येतंय. कामाच्या तणावातून अनेक जवान आयुष्य संपवण्याचा टोकाचा मार्ग अवलंबत आहेत.

सैनिकांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय?

1. घुसखोरीविरोधी किंवा दहशतवादविरोधी कारवायांमुळे तणाव

यूएसआयने केलेल्या या अहवालात जवानांमधील तणावाच्या कारणांपैकी एक कारण सातत्याने होणाऱ्या दहशतवादविरोधी कारवाया (काउंटर इंसर्जंसी किंवा काउंटर टेररिझम ऑपरेशन्स) हे आहे. या मोहिमांमुळे सैनिकांवर जीवघेणा तणाव येत आहे. या मोहिमांमध्ये सातत्याने अनुभवाला येणारं प्रचंड तणावपूर्ण वातावरण हे या आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे. हे संशोधन कर्नल ए. के. मोर यांनी केलंय. कर्नल मोर 2019-2020 या काळात यूएसआयमध्ये सीनियर रिसर्च फेलो होते. ऑपरेशनल आणि नॉन ऑपरेशनल कारणांमुळे सैनिकांमध्ये तणाव निर्माण होत आहे हेही यात नमूद करण्यात आलंय. निम्म्याहून अधिक सैनिक तणावाच्या सावलीत आहेत असं वाटत असल्याचंही निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय.

2. तणाव कमी करण्याच्या सर्व उपाययोजना अपयशी

भारतीय सैन्यात दरवर्षी आत्महत्या, सहकाऱ्याकडून हत्या किंवा इतर कारणांनी जीव जाणाऱ्या सैनिकांची संख्या शत्रूसोबत लढताना होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक आहे. मागील 15 वर्षांमध्ये संरक्षण मंत्रालयाने आणि सैन्याने तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यात. यानंतरही याचा आवश्यक परिणाम झालेला दिसत नाही. युनिट्स आणि सब युनिट्स तणावात आहेत. त्यामुळे या घटनांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. युनिट्समध्ये बेशिस्तपणा, ट्रेनिंगची खराब अवस्था, उपकरणांचं वाईट व्यवस्थापन आणि खचलेली मनःस्थिती याचा युद्धाच्या तयारीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

3. अधिकारी राहत असलेल्या ठिकाणी मोबाईल बंदी असल्यानेही जवानांची अडचण

अधिकाऱ्यांमध्ये तणाव असणाऱ्यामागील प्रमुख कारण नेतृत्वातील दोष हेच आहे. याशिवाय अतिरिक्त तणाव, कमी संसाधनं, सातत्याने होणाऱ्या पोस्टिंग, पोस्टिंग आणि प्रमोशनमध्ये होणारा भेदभाव आणि अपारदर्शकता, खराब राहण्याच्या जागा, आणि सुट्टी न मिळणं ही कारणंही आहेत. जुनिअर कमीशंड ऑफिसर्स (जेसीओ) किंवा इतर रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये तणावाचं मुख्य कारणं सुट्टी देण्यास उशीर करणे किंवा सुट्टी नाकारणे, अतिरिक्त काम, घरगुती प्रश्न, वरिष्ठांकडून होणारं शोषण, आदराची कमतरता, तर्कहीन कारणं देत मोबाईल फोनवर बंदी, मनोरंजनाच्या अपुऱ्या सुविधा, आणि सिनियर्स आणि जुनियर्समधील नाराजी ही आहेत.

या नुकसानीची भरपाई होणं अवघड

विशेष म्हणजे युएसआयच्या हा अहवाल करताना तिन्ही दलांच्या प्रमुखांचीही मतं जाणून घेण्यात आलीत. सैन्यात दरवर्षी सरासरी 100 सैनिकांचा जीव आत्महत्या किंवा सहकाऱ्याकडून होणाऱ्या हल्ल्यात जात आहे. ही खूपच गंभीर बाब असून प्रत्येक तिसऱ्या जवानाचा जीव घेत आहे. हे नुकसान भरुन येणं अवघड आहे.

हेही वाचा :

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

भारताचे लष्कर प्रमुख सौदी अरब-यूएईत, पाकिस्तानमध्ये खळबळ

These are the important reasons forcing Indian Army soldiers to commit suicide every year

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें