AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी अभिमानाचा क्षण! फायटर पायलट शुभांशू शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम स्पेसच्या अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी अंतराळात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता अंतराळ स्थानकासाठी रवाना होतील.

भारतासाठी अभिमानाचा क्षण! फायटर पायलट शुभांशू शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज
Shubhanshu Shukla
| Updated on: Jun 09, 2025 | 4:55 PM
Share

१४० कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम स्पेसच्या अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी अंतराळात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर ते ११ जून २०२५ रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहेत. शुभांशू शुक्ला यांच्या या मोहिमेमुळे राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने अवकाशात गेले होते तो क्षण ताजा झाला आहे.

शुभांशू यांना विशेष प्रशिक्षण

शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहेत, तसेच ते गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी शुक्ला यांची निवड केली होती. अ‍ॅक्स-४ ही मोहीम भारत आणि नासा यांच्यातील सहकार्याने राबविले जात आहे. या आभियानासाठी शुभांशू यांनी स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेसकडून विशेष प्रशिक्षण देखील घेतले आहे.

उड्डाणापूर्वी चाचणी

शुभांशू शुक्ला यांच्यासोबत इतर काही सहकारी अंतराळात जाणार आहेत. या टीमच्या प्रक्षेपणाची पूर्ण झाली आहे. अ‍ॅक्स-४ क्रू आणि स्पेसएक्स टीमने प्रक्षेपणापूर्वी सराव केला आहे. यावेळ फाल्कन ९ रॉकेटची स्टॅटिक फायर चाचणी देखील करण्यात आली. अ‍ॅक्स-४ मिशन १० जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे.

अ‍ॅक्स-४ मिशन काय आहे?

अॅक्स-४ मिशन हे स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आहे आणि १५ वे मानवी अंतराळ अभियान आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हेही अंतराळात जाणार आहेत. ही मोहीम आधी ८ जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

शुभांशू शुक्ला अंतराळात प्रयोग करणार

समोर आलेल्या माहितीमुसार भारताने या मोहिमेवर सुमारे ५४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये शुभांशू शुक्ला आणि त्यांचे बॅकअप ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या दोघांचे प्रक्षेपण आणि प्रशिक्षण याचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला वनस्पतींच्या बियाण्यांवर आणि मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो याबाबत प्रयोग करणार आहेत.

शुभांशु शुक्ला यांची कारकीर्द

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.