भारतीय तपास यंत्रणा दाऊदच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत? महत्त्वाची माहिती समोर

दाऊद इब्राहिमबद्दल (Dawood Ibrahim) एक नवीन माहिती भारताच्या तपास यंत्रणांना मिळालीय. आणि ही माहिती दाऊदचा भाच्याच्या चौकशीतून समोर आलीय.

भारतीय तपास यंत्रणा दाऊदच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत? महत्त्वाची माहिती समोर
DAWOOD
Image Credit source: DAWOOD
| Updated on: Jan 17, 2023 | 11:05 PM

मुंबई : मुंबईचा गुन्हेगार डॉन दाऊद इब्राहिमनं (Dawood Ibrahim) वयाच्या 67 सालात दुसरं लग्न केल्याची माहिती समोर आलीय. दाऊदचा भाचा म्हणजे हसीन पारकरचा मुलगा अलीशाहच्या चौकशीतून हे समोर आलंय. दुसरं लग्न कुणाशी केलं? त्याची माहिती मिळालेली नाही. मात्र दाऊदची दुसरी पत्नी ही पाकिस्तानच्या पठाण परिवारातली आहे. दाऊद इब्राहिमच्या पहिल्या पत्नीचं नाव महजबीन आहे. त्याची पत्नी सणवाराला अनेकदा व्हॉट्सअॅप कॉलद्वारे भारतातल्या नातलगांशी संपर्क करते. दाऊदच्या भाच्याच्या माहितीनुसार जुलै 2022 मध्ये दुबईत त्याची भेट महजबीनशी झाली होती. त्याच भेटीत दाऊदच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर आली.

दरम्यान, एनआयएच्या चौकशीवेळी दाऊदच्या भाच्यानं पाकिस्तानात दाऊद इब्राहिम राहत असलेल्या पत्त्याचीही पुन्हा एकदा माहिती दिली. त्यानुसार कराचीतल्या डिफेंस एरिया भागात अब्दुल्ला गाजी बाबाचा एक दर्गा आहे. त्याच भागात दाऊदचं घर असल्याची माहिती दाऊदचा भाचा अलिशाहनं दिलीय.

दाऊदच्या दुसऱ्या लग्नाची बातमी महत्वाची मानली जातेय. कारण तपास यंत्रणांच्या ससेमिरा थांबावा म्हणून डी गँगनं अनेक अफवा पेरल्या होत्या, ज्यात दाऊद अंथरुणाला खिळलाय, त्याची प्रकृती बिघडलीय सारख्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

मध्यंतरी दाऊदनं पाकिस्तानातला पत्ताही बदलवल्याची चर्चा होती. मात्र दाऊद पाकिस्तानातल्या कराचीतच आहे. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

दम्यान आता दाऊदचं लग्न कधी झालं, त्या लग्नाला कोण-कोण हजर होतं, आणि दाऊदच्या दुसऱ्या बायकोची पार्श्वभूमी काय आहे, तिचे तार पाकिस्तान सरकारमधल्या कुणाशी आहेत का? याचा तपास करण्याचं आव्हान सुरक्षा यंत्रणांकडे आहे.