धक्कादायक, रेल्वे चालक चहा पिण्यासाठी थांबला अन् ड्रायव्हर विना रेल्वे 100 किमी वेगाने 80 किमी धावली

| Updated on: Feb 26, 2024 | 10:17 AM

विना चालक मालगाडी धावल्या प्रकरणी अजून कोणत्याही रेल्वे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मालगाडी विना ड्रायव्हर धावत असताना दुसऱ्या दिशेकडून कोणतीही ट्रेन आली नाही. यामुळे मोठा अपघात टळला.

धक्कादायक, रेल्वे चालक चहा पिण्यासाठी थांबला अन् ड्रायव्हर विना रेल्वे 100 किमी वेगाने  80  किमी धावली
good train
Follow us on

नवी दिल्ली, दि. 26 फेब्रुवारी 2024 | भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. सर्वात सुरक्षित प्रवास रेल्वेचा म्हटला जातो. परंतु जम्मू-काश्मीरमधून सर्वात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालगाडी ड्रायव्हर नसताना सुसाट निघाली. चालकाविना 80 किमी वेगाने 90 किमी धावली. सुदैव चांगले होते, कुठेही दुर्घटना घडली नाही. ही रेल्वे थांबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आता या प्रकारची उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणावर कारवाई झाली नाही.

काय झाला प्रकार

जम्मू-कश्मीरमधील कठुआ रेलवे स्टेशनवर मालगाडी रविवार सकाळी सात वाजता थांबली होती. मालगाडीत क्रॉक्रेंट होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालगाडीचा ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर कठुआ स्टेशनवर चहा घेण्यासाठी थांबले. इंजिन सुरु ठेऊन दोघे खाली उतरले. तसेच खाली उतरण्यापूर्वी हँडब्रेक खेचला नाही. ड्रायव्हर आणि त्याचा सहकारी चहा पिण्यासाठी पुढे जाऊ लागले दुसरीकडे मालगाडीने वेग धरण्यास सुरुवात केली. 53 डब्यांच्या मालगाडी धावू लागली. तिचा वेग शंभर किलीमोटरपर्यंत गेला होता. अधिकाऱ्यांनी पंजाबमधील सुजानपूर, पठाणकोट कँट, कांदोरी, मिरथल, बांगला येथे गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही.

वाळूच्या गोण्यांनी थांबवली मालगाडी

जवळपास 84 किलोमीटरपर्यंत ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत होती. तिला रोखण्याचे प्रयत्न केले जात होते. कुठे दुसरी गाडी समोर आल्यास काय होईल, या विचाराने रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अखेर पंजाबमधील मुकेरियनमधील उची बस्सीजवळ वाळूच्या गोण्यांच्या मदतीने एका चढावाच्या ठिकाणी मालगाडीला थांबवण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मालगाडीने ड्रायव्हर नसताना एकूण 84 किलोमीटर अंतर कापले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 प्रकरणाची चौकशी सुरु

विना चालक मालगाडी धावल्या प्रकरणी अजून कोणत्याही रेल्वे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मालगाडी विना ड्रायव्हर धावत असताना दुसऱ्या दिशेकडून कोणतीही ट्रेन आली नाही. यामुळे मोठा अपघात टळला.